Anurag Kashyap : फिल्ममेकर अनुराग कश्यप नेहमीच काही विधाने किंवा वक्तव्ये करतो आणि चर्चेत येतो. पण यावेळी त्याची मुलगी एका विधानाने चांगलीच चर्चेत आली आहे. अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप (Aliyah kashyap) २२ वर्षांची आहे. ती ट्रॅव्हल ब्लॉग बनवते आणि त्यातूनच तिची कमाईही होते. तिचे युट्यूब चॅनलही आहे.
एका मुलाखतीत अनुराग म्हणाला, 'पालक अनेक वेळा आपल्या मुलांना समजून घेत नाहीत. मुलं सुरक्षित राहिली पाहिजेत असंच आपल्याला वाटत राहते. पण आलियाने मला तोंडावर एक उत्तर दिले. ती म्हणाली की तुम्हाला मला पैसे देण्याची गरज नाही. माझा संघर्ष स्वत:सोबतच आहे. मला स्वत:ला स्वत:सारखंच राखण्यासाठी मेहनत करावी लागते. मी युट्यूबवर खूश आहे, जेव्हा की माझी पिढी सगळी ऑनलाईन असते. पण मी यातून कमाई करते. मी किती कमावते हे तुम्ही जाणून घेण्याची गरज नाही. ' ती असंही म्हणाली, 'मी कसंही कमवत असेल, कमवत तर आहे ना? घराचं भाडंही मीच भरते. मग तुम्हाला काय अडचण आहे ?'
आलियाच्या या उत्तरावर अनुराग कश्यप म्हणतो, 'खरंच आहे. ती एक स्वतंत्र मुलगी आहे. स्वत:चा खर्च स्वत:च उचलते. तिला माझी गरज नाही. तिला माझ्या स्ट्रगलशी काहीच देणंघेणं नाही.'
अनुराग कश्यपने मुलीने दिलेला हा सल्ला त्याच्या आगामी सिनेमातही वापरला आहे. 'ऑलमोस्ट प्यार विद डीजे मोहोब्बत' हा सिनेमा ३ फेब्रुवारीला रिलीज होत आहे. यामध्ये अलाया एफ (Alaya F) आणि करण मेहता (Karan Mehta) मुख्य भूमिकेत आहेत तर विकी कौशलने कॅमिओ केला आहे. अनुरागने सिनेमाची कथा लिहिली आहे तसंच दिग्दर्शन केले आहे.