Join us

अनुष्का सेन, हितेन तेजवानी, मानसी श्रीवास्तव, अनुराग शर्मा झळकणार 'स्वांग’मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 15:17 IST

ही गूढ आणि रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेते अनुष्का सेन, हितेन तेजवानी, मानसी श्रीवास्तव, अ‍ॅलन कपूर आणि अनुराग शर्मा ही कलाकार मंडळी हंगामा प्ले’च्या आगामी ओरीजनल शो स्वांग’मध्ये झळकणार आहेत. ही गूढ आणि रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन बहिणींच्या धक्कादायक रहस्याने त्यांच्या राहत्या लहानशा शहरात खळबळ माजते असे कथासूत्र असेल.  

 

कुटुंब, बालिका वधू, कसौटी जिंदगी की, गुप्ता ब्रदर्स आणि अशा अनेक मालिकांमधून रसिकांना भावलेला अभिनेता हितेन तेजवानी म्हणाला की, “मी स्वांग’ची कथा वाचल्यावर आपण या मालिकेचा भाग होऊ हे पक्के केले. प्रत्येकाला गुन्हेविषयक थरारपट  पाहायला आवडते. एकदा प्रक्षेपण झाल्यावर या शैलीतील एक सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून स्वांग नाव कमावेल याचा मला विश्वास वाटतो. मी यापूर्वी ही शैली केलेली नाही. त्यामुळे त्यात काम करणे अधिक मनोरंजक ठरेल.”

  अनुराग शर्मा म्हणाला की, “स्वांग’च्या सेटवर प्रत्येक दिवस नवा ठरेल. कारण याचा प्रत्येक प्लॉट आमच्यापैकी प्रत्येकाला पकडून ठेवणारा असल्याने आम्हाला सातत्याने सुधार करणे भाग असेल. ज्यामुळे आम्हाला चांगला बदल घडवून आणण्याची संधी आहे. एक अभिनेता म्हणून कायमच तुम्हाला अशा मालिकांचा भाग होण्याची इच्छा असते. या संधी तुम्हाला कंफर्ट झोनच्या बाहेर आणतात. मला स्वांग’मध्ये संधी मिळाली याचा आनंद वाटतो.”  स्वांगचे दिग्दर्शन नितेश सिंग यांनी केले असून हा कार्यक्रम लवकरच हंगामा प्ले आणि अन्य पार्टनर नेटवर्कवर उपलब्ध होणार आहे. 

टॅग्स :हितेन तेजवानी