अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसह दुबईत आहे. विराट दुबईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी गेला असून अनुष्का त्याच्यासोबत आहे. दरम्यान, अनुष्काने आपले बरेचसे फोटो शेअर केले आहेत. फोटोत बेबी बंपही दिसत आहे. अलीकडेच अनुष्काने तिचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंवरही तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटस केले होते.
आता नवीन फोटो शेअर करत पुन्हा अनुष्काने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटोत तिच्या चेह-यावर प्रचंड ग्लो आल्याचेही पाहायला मिळत आहे. बॉलिवूड सेलेब्सही तिचे कौतुक करत आहेत. प्रत्येकजण या फोटोवर हार्ट इमोजी पोस्ट करत आहे. तसेच चाहतेही अनुष्काला स्वत: ची काळजी घेण्यास सांगत आहेत.
यापूर्वी विराट कोहलीने अनुष्कासोबत एक फोटो शेअर केला होता, दोघेही रिलॅक्स मूडमध्ये दिसले. विराट सह अनुष्काचा हा फोटो एबी डिव्हिलियर्सनं काढला क्लिक केला होता.शनिवारी अनुष्का रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स सामना पाहण्यासाठी आली होती, या सामन्यादरम्यान अनुष्का तिचा नवरा विराट कोहलीला चिअरअप करताना दिसली. स्टेडियममधील अनुष्काचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतोय विराट
काही दिवसांपूर्वी विराटला विचारले गेले होते की जानेवारीत नवीन पाहुणा तुमच्या घरी येणार आहे तुला कसे वाटते? या प्रश्नाचे उत्तर देताना विराटने सांगितले होते की जेव्हा अनुष्काने गुड न्युज दिली तेव्हापासून त्याच्या आनंद हा गगणात मावेनासा झाला आहे. शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्याच्यासाठी शब्दही अपुरेच पडतील असा तो आनंद आहे.
अनुष्का शेटवची झिरो सिनेमात दिसली होती. तिच्यासोबत या सिनेमात मुख्य भूमिकेत शाहरुख खान आणि कतरिना कैफही झळकले होते. इतकी लोकप्रिय चेहरे असूनही हा सिनेमा फ्लॉप ठरला.त्यानंतर अनुष्काजवळ कोणत्याच सिनेमाची ऑफर आली नाही. तसेच डिलेव्हरीनंतरच ती तिच्या नवीन कामांना सुरूवात करणार असल्याच्याही चर्चा आहेत.
IPL 2020: अनुष्का-विराटच्या 'त्या' व्हिडीओनंतर ५ महिन्यांनी जे घडलं, त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही
मार्चमध्ये देशात लॉकडाऊन झाला. त्यामुळे खेळाडूंना पुरेसा सराव करता आला नाही. एप्रिलमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये अनुष्का विराटला 'ए कोहली चौका मार ना', असं मजेशीरपणे म्हणत होती. त्यानंतर जवळपास ५ महिन्यांनी दुबईत आयपीएलला सुरुवात झाली. मात्र आतापर्यंच्या ३ सामन्यांत तरी विराटला चौकार मारता आलेला नाही.