अनुष्का शर्माचा ‘सुईधागा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यानंतर ती शाहरूख खानच्या ‘झिरो’मध्ये दिसणार आहे. आज अनुष्का शर्माची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. गत काही वर्षांत बॉलिवूडमध्ये तिने आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आज बी-टाऊनच्या ए-लिस्ट अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतल्या जाते.मॉडेलिंगपासून सुरू झालेला अनुष्काचा प्रवास बॉलिवूडपर्यंत येऊन पोहोचला. या काळात अनुष्काने स्वत:ला बरेच बदलले, प्रचंड संघर्ष करून, कष्टाने आपले स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, मॉडेलिंगच्या दिवसांतील अनुष्काचे फोटो.
होय,अनुष्काने बरीच वर्षे मॉडेलिंगमध्ये घालवलीत. त्या स्ट्रगल पीरियडमधील अनुष्काला आज ओळखणेही कठीण आहे. होय, त्या दिवसांत अनुष्का इतकी वेगळी दिसायची की, तिचे फोटो पाहून तिला कुणीही ओळखणार नाही.वयाच्या १५ व्या वर्षांपासूनचं अनुष्काने आपल्या मॉडेलिंगची सुरूवात केली होती. यानंतर पाच वर्षे ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात होती.
हे फोटो पाहा,या फोटोंमध्ये अनुष्काला ओळखणेही कठीण आहे.डिझाईनर किरण उत्तम घोष यांच्या कलेक्शनसाठी रॅम्पवर उतरलेली ही अनुष्काचं आहे, यावर क्षणभर विश्वास बसत नाही.
अनुष्काचा हा फोटो २००७ मधील आहे.