विराटने मुलगी झाल्याचे जाहीर करताच अवघ्या काही क्षणांतच विरूष्का ट्रेंडमध्ये आले.अनुष्काने बाळाला जन्म दिल्यानंतर रोज या दोघांची काही ना काही चर्चा ही रंगत असते. अनुष्का आणि बाळाची प्रकृती चांगली असून सध्या त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर केला जावा त्यांना प्रायव्हसी दिली जावी अशी विनंती विराटने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना केली होती.
इतकंच नाही तर विराटने जवळच्या नातेवाईकांनाही अनुष्का आणि बाळाला हॉस्पिटलमध्ये भेटण्याची परवानगी दिलेली नाही. तसेच शुभेच्छा म्हणून कोणाकडूनही फुलं किंवा भेटवस्तूही न घेण्याचा निर्णय या दोघांनी घेतला आहे. सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी घेतलेली खबरदारी म्हणून हे दोघे सध्या सगळ्यांपासून दूर राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हॉस्पिटलमधली सुरक्षा देखील आधीपेक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. जे लोक आजूबाजूच्या रूम्समध्ये आहेत त्यांना भेटायला येणाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना मुलीची झलक दिसू नये याची खास सोय करण्यात आली आहे.
हॉस्पिटल बाहेर मीडियाची असलेली गर्दी पाहून अनुष्का आणि मुलीला दुस-या मार्गाने घरी पाठविण्याचा विचार केला जात असल्याचेही म्हटले जात आहे.11 डिसेंबर 2017 रोजी विराट आणि अनुष्का यांनी इटलीत लग्न केले होते. लग्नातदेखील विराटने आपल्या नातेवाईकांना आमंत्रित केले नव्हते.
Super Cute! काकाने शेअर केला ‘विरूष्का’च्या लेकीचा पहिला फोटो, नाव ठेवले...!!
विराटचा भाऊ विकास कोहलीने सोशल मीडियावर कोहली कुटुंबातील या ‘लक्ष्मी’चा पहिला फोटो शेअर केला होता. फोटोत तिचा चेहरा दिसत नाही तर फक्त इवलीशी पावलं तेवढी दिसतात. पांढ-या शुभ्र कापडावर भाचीची इवलीशी पावलं आणि सोबत तिचे स्वागत करणारी कार्टून पात्र असा एक काही सेकंदांचा व्हिडीओव फोटो त्याने पोस्ट केला होता.अनुष्का व विराट यांनी आपल्या लेकीचे नाव अन्वी ठेवल्याचे कळतेय. अनुष्का आणि विराट या नावाला मिळून अन्वी असे नामकरण करण्यात आल्याचे कळतेय. अर्थात अद्याप विरूष्काने अद्याप अधिकृतपणे तिच्या नावाची घोषणा केलेली नाही. अन्वी म्हणजे लक्ष्मी. विरूष्काच्या घरात लक्ष्मी आली आहे आणि त्याअर्थाने हे नाव अगदीच समर्पक आहे.