अनुष्का शर्मा (Anushka Sharma) विराट कोहलीसोबत लग्न करून सेटल झालीये. आता तर दोघांच्या संसारवेलीवर वामिकाच्या रूपात एक गोंडस फुलही फुलले आहे. आता वेळ आहे ती भावाला सेटल करण्याची. आम्ही बोलतोय ते अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा (Anushka Sharma's brother Karnesh)याच्याबद्दल. कारण काय तर एका हिरोईनसोबतची कर्णेशी दोस्ती.होय, सध्या कर्णेश व या हिरोईनच्या मैत्रीच्या चर्चा जोरात आहेत. अगदी चर्चा खरी मानाल तर ही मैत्री मैत्रीच्या पलीकडे गेली आहे. आता ही अभिनेत्री कोण तर बुलबुल या चित्रपटात झळकलेली तृप्ती डिमरी (Tripti Dimri).ई-टाईम्सने याबाबचे वृत्त दिले आहे.
तृप्तीने कर्णेशच्या होम प्रॉडक्शनच्या ‘बुलबुल’ या सिनेमात लीड भूमिका साकारली होती. दोघेही या सिनेमाच्या सेटवर भेटले आणि इथेच दोघांची मैत्री फुलले. आता बी-टाऊनमध्ये याच मैत्रीच्या चर्चा आहेत.तृप्ती व कर्णेश यांची मैत्री पाहून दोघांमध्ये काहीतरी खिचडी शिजतेय, असे मानले जातेय. अर्थात तृप्ती व कर्णेश दोघेही यावर बोलायला तयार नाहीत.
तुम्हाला आठवत असेल तर अनुष्काने एकप्रकारे कधीच या नात्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. अनुष्काने अलीकडे कर्णेश व तृप्तीचा एका फोटो शेअर करत, मिस यू म्हटले होते़ तृप्ती अनुष्काला चांगलीच आवडल्याचेही म्हटले जातेय.डेहरादूनची तृप्ती 2017 मध्ये श्रेयस तळपदेच्या ‘पोस्टर बॉयज’मध्ये दिसली होती. यानंतर ती मुंबईत सेटल झालीये. काही महिन्यांपूर्वी तिचा ‘लैला मजनू’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात अभिनेता अविनाश तिवारी लीड रोलमध्ये होता.
येत्या काळात तृप्ती अनेक इंटरेस्टिंग प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. करण जोहरच्या एका सिनेमात ती इशान खट्टरसोबत दिसणार असल्याचीही चर्चा आहे. याशिवाय तिने ‘ऐनिमल’ हा सिनेमा साईन केला आहे. यात रणबीर कपूर व परिणीती चोप लीड रोलमध्ये आहे. अनुष्काच्या पुढच्या होम प्रॉडक्शनच्या ‘काला’ या सिनेमातही तृप्ती झळकणार आहे. या चित्रपटातून दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील बॉलिवूड डेब्यू करतोय.