Join us

अनुष्का शर्माची लेटेस्ट फोटशूटमधील पोज झाली व्हायरल, ट्रोलर्स विचारतायेत, कंबर दुखी आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 15:00 IST

अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतेच फोटोशूट केले असून या फोटोशूटची सध्या सगळीकडे खूप चर्चा होत आहे. या फोटोंवर खूप कमेंट्स येत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लेटेस्ट फोटोशूट ट्रोल झाल्यामुळे चर्चेत आली आहे. तिने इंस्टाग्रामवर ब्लू आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोत तिने हटके पोज दिल्या आहेत. हे फोटो ट्रोलर्सच्या नजरेस पडल्या आहेत. ट्रोलर्सचे म्हणणे आहे की, अनुष्काची ही पोज पाहून कंबर दुखीची आठवण येते. या फोटोवर खूप फनी कमेंट्स येत आहेत.

सोशल मीडियावर अनुष्का शर्माच्या फोटोवरील कित्येक मीम्स व्हायरल झाल्या आहेत. तसे तर अनुष्का व मीम्सचे जुने नाते आहे. सुई धागा चित्रपटाचे पोस्टर व ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनुष्कावर बरेच मीम्स बनले होते. मात्र यावेळेस लोकांनी तिच्या पोझला टार्गेट केले आहे.

हा ट्रेंडी ड्रेस परिधान करून अनुष्का नुकतीच मुंबईतील एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. एका युजरने फनी कमेंट करत लिहिले की, कोणीतरी पटकन अनुष्का शर्माला मूव द्या.

 

सोशल मीडियावर अनुष्काच्या फोटोची खूप थट्टा उडवली जाते.

 

 

मूवच्या जाहिरातीच्या फोटोमध्ये देखील लोक कमेंट बॉक्समध्ये अनुष्काचा फोटो शेअर करत आहेत. अनुष्काच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सांगायचे तर तिचा झिरो चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती शाहरूख खान व कतरिना कैफसोबत दिसली होती.

टॅग्स :अनुष्का शर्माझिरो सिनेमा