सध्या अनुष्का शर्मा तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. तर विराटही बाळाची आतुरतेने वाट पाहात आहे. सध्या विराट आयपीएलसाठी यूएईला गेला आहे. करोनामुळे तो जवळपास पाच महिने घरी होता. दोघांनी एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ या काळात शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घ्यायचे.
दरम्यान विराट अनुष्काची विशेष काळजी घेतोय. दोघेही कामाव्यतिरिक्त त्यांचा क्वॉलिटी टाईमही एन्जॉय करताना पाहाला मिळतात. अनुष्काच्या आई होण्यावरुन गेल्या काही दिवसांत बऱ्याच चर्चा ऐकायला मिळत होत्या. त्याच दरम्यान विराट- अनुष्काने नवीन वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये त्यांच्या घरी बाळाचे आगमन होणार असल्याचे सांगत पहिल्यांदाच 'गुड न्युज' सांगितली होती. 'गुड न्युज' शेअर करताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
नेटवर्क १८ लोकमतने दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या एका मुलाखतीत विराटने अनुष्काची डिलेव्हरी डेटही सांगितली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)च्या ऑफिशिअल यूट्यूब चॅनलवर मुलाखत देत असताना विराट कोहलीने 10 नोव्हेंबरला बाळाचा जन्म होण्याची शक्यता आहे असं सांगितलं. पहिल्यांदाच अशा प्रकारे विराटने डिलेव्हरी डेट सांगताच या व्हिडीओने सा-यांचे लक्ष वेधून घेतले.
विराटचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. इतकेच काय तर बाळाच्या जन्माची तारीख वाचून अवघ्या 2 मिनिटांत त्या पोस्टला 1627 लाइक्स आले होते. मात्र काही कारणामुळे हा व्हिडीओ नंतर डिलीट करण्यात आला आहे. अनुष्का आणि विराटने डिसेंबर 2017 ला इटलीमध्ये लग्न केले होते.
विरुष्काच्याने दिलेल्या गुड न्युज पोस्टनेही अनोखा विक्रम रचला होता.
आतापर्यतं सेलिब्रिटींकडून करण्यात आलेल्या खास घोषणांच्या पोस्टमध्ये विरुष्काच्या या फोटोला सर्वांत जास्त लाईक्स मिळाले आहेत. त्यांच्या या पोस्टला आतापर्यंत १५.३ दशलक्षहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
सर्वाधिक लाईक्स मिळणा-या फोटोंमध्ये विरूष्काच्या या फोटोचा समावेश आहे. इतर लोकप्रिय सेलिब्रेटींच्याही विरूष्काच्या या फोटोने लाईक्सच्या बाबतीत मागे टाकले आहे.