Join us

अनुष्कानं शेअर केलेला बिकनीतला फोटो होतोय ट्रोल, फोटोची तुलना होतेय VLC सोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 14:26 IST

अनुष्कानं तिचा बिकनीतील फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा भलेही चित्रपटांपासून दूर असली तरी देखील ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. अनुष्का तिच्या चाहत्यांना प्रत्येक गोष्टींचे अपडेट देत असते. या दरम्यान अनुष्कानं तिचा बिकनीतील फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोत ती खूप छान दिसते आहे. मात्र तिचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून या फोटोची तुलना व्हिएलसीसोबत होताना दिसते आहे. 

अनुष्का शर्माने शेअर केलेल्या या फोटोत तिने ऑरेंज रंगाचा स्विम सुट परिधान केला आहे. यामध्ये ती खूप हॉट दिसते आहे. या फोटोत अनुष्का समुद्राच्या किनारी बसली असून तिने ड्रॉप इयररिंग व सनग्लासेस घातले आहेत. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन दिलं की, सन किस्ड एंड ब्लेस्ड

अनुष्का शर्माचा बिकनीतील फोटो चाहत्यांना खूप भावतो आहे. तर तिच्या या फोटोवर अनुष्काचा नवरा व भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनेदेखील कमेंट केली आहे. 

अनुष्काचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर मीम्स बनले असून लोक तिच्या बिकनीची तुलवा व्हिडिओ व्हिएलसी प्लेअर सोबत करत आहेत.

अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती मागील वर्षी डिसेंबरमध्ये शाहरूख खानच्या झिरो चित्रपटात झळकली होती. या चित्रपटानंतर अनुष्का बॉलिवूडपासून दूर आहे.

 

मात्र लवकरच ती वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीशाहरुख खानझिरो सिनेमा