अप्पी व अर्जुनची लग्नानंतरची पहिली दिवाळी असल्याने, कदम घराण्यात काय विशेष असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. घरच्या सुनेला सरकारांकडून कदम घराण्याचा पिढ्यानपिढ्या सांभाळलेला दागिना, ‘राणीहार’हा अप्पीला दिला जाणार तो हार बघून मनीचे डोळे फिरतात. ती दिवाळीसाठी घरी आलेल्या अप्पीच्या घरच्यांच्या फराळाच्या डब्यात तो राणीहार टाकते. हार बापुंकडे सापडल्याने घरात तमाशा होतो.
तेव्हा अर्जुन हुशारीने असा काही जुगाड करतो की सर्वांसमोर मनीमावशीचं भांडं फुटत आणि घरच्या लक्ष्मीला म्हणजेच अप्पीला, अर्जुन स्वतःच्या हातानी लक्ष्मीपूजनात 'राणीहार' अप्पीच्या गळ्यात घालतो. अर्जुनच्या घरात झालेल्या अपमानामुळे सुषमा तिचे दागिने मोडून अर्जुनसाठी चैन बनवायला बापूंना सांगते. पण सुश्मासाठी केलेला एकमेव दागिना मोडावा लागल्याने बापू नाराज होतात. तर अप्पी घरात सरकारने हार अप्पिला दिल्याने मनी रूपालीचे कान भरते. तर दिप्या अर्जुनकडे येऊन, घरचे सोने गहाण ठेवून अर्जुनसाठी बनवलेल्या सोन्याच्या चैन बद्दल त्याला सांगतो.मनी हीच चोर असल्याने सर्वजण तिला दिवाळीच्या पूजेत घरात घ्यायचे नाही, असा निर्णय घेतात. सर्व परिवार एकत्र येऊन अर्जुन-अप्पीची पहिली दिवाळी आणि लक्ष्मी पूजा साजरी करतात.