Join us

अपूर्वा नेमळेकर झाली भावूक म्हणाली "हे ही दिवस जातील .... सरी सुखाच्या येतील"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 11:59 AM

नागरिकांना कोरोनासंदर्भातील सगळे नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनापासून बचावासाठी जागरूक राहणे आणि योग्य काळजी घेणे हाच पर्याय असल्याचे अपूर्वा नेमळेकरनेही आपल्या व्हिडीओत म्हटले आहे.

कोरोना विषाणूच्या विरुध्द सर्व जगच लढा देत आहे.देशात करोनामुळे भयंकर परिस्थिती आहे. सध्या संपूर्ण जग कोरोनामुळे त्रस्त झाला आहे. प्रत्येकजण या संकटातून कधी सुटका होईल यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि गेल्या वर्षी प्रमाणेच पुन्हा एकदा सारेच घरात बंदिस्त झाले. तरीही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक होत आहे. सर्वत्रच निराशेचे वातावरण पसरले आहे. कलाकारदेखील जनतेला घरात राहा, सुरक्षित राहा म्हणत आवाहन करत आहेत. 

अशात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने देखील व्हिडीओच्या माध्यमातून सद्यपरिस्थितीवर दुःख व्यक्त केले आहे. सर्व नागरिकांना कोरोना विषाणू बद्दल जागरुक राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना कोरोनासंदर्भातील सगळे नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनापासून बचावासाठी जागरूक राहणे आणि योग्य काळजी घेणे हाच पर्याय असल्याचे अपूर्वानेही आपल्या व्हिडीओत म्हटले आहे.

 व्हिडीओमध्ये तिने सांगितले की,  आणि पुन्हा एकदा आपण थांबलो, आता आपल्याला थांबावच लागेल. कारण सांगू शकत नाही बोलू शकत नाही कित्येक वाईट प्रसंग कित्येक कुटुंबाना सामोरे जावे लागले.देव त्या सगळ्या परिवांना शक्की आणि बळ देओ. सगळ्यांचेच रक्षण करो. काय होतंय ना रोज आपल्या कानावरती खूप वाईट बातम्या येतात. त्यामुळे आपण आणखी हतबल होतोय घाबरून जातोय. पण घाबरू नका. ही वेळ सुद्धा निघून जाईल. शेवटी आपली सुरक्षा ही आपल्याच हातात आहे.

वेळोवेळी स्वच्छ हात धुवा, सॅनिटाईझरचा वापर करा, मास्क लावा आणि तुमची इम्युनिटी कशी वाढेल याकडे लक्ष द्या. श्रीकृष्णनेही भगवती गीतेत सांगितले आहे. कमजोर तुम्ही नाही, तुमची वेळ आहे. तुमचं जीवन हे ना तुमच्या भविष्यात आहे ना तुमच्या अतितमध्ये.ते आहे या क्षणामध्ये तर हा क्षण जपा.घराबाहेर उगाचच पडू नका, स्वतःची काळजी घ्या, तुमच्या घरच्यांचीही काळजी घ्या. सुरक्षित राहा.

टॅग्स :अपूर्वा नेमळेकरमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस