Join us

आरारा खतरनाक..! भर सेटवर या प्रसिद्ध अभिनेत्रीनं अभिनेत्याला ९७ वेळा केलं KISS, होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 2:52 PM

अभिनेत्रीने चित्रपटातील अभिनेत्याला ९७ वेळा किस केले हे ऐकून सर्वजण हैराण झाले आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता प्रभास (Prabhas)चा बहुचर्चित चित्रपट 'राधे श्याम' (Radhe Shyam) ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे  (Pooja Hegde) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रभास आणि पूजाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो आहे.

'राधे श्याम' चित्रपटात पूजा हेगडेनं प्रभाससोबत बोल्ड सीन शूट केले असून दोघांच्या इंटिमेट सीनचा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघांची लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला दाखवण्यात आले आहे की, विक्रमची भूमिका करणारा प्रभास पूजाला आवडतो. पण प्रेमावर विश्वास ठेवण्याऐवजी तो फ्लर्टिंगबद्दल बोलतो आणि नंतर या दोघांची लव्हस्टोरी फुलते. या चित्रपटात पूजा आणि प्रभास यांची लव्हस्टोरी एका भव्य ठिकाणावर सुरु होते.

पूजा आणि प्रभास पहिल्यांदाच दिसणार एकत्र'राधे श्याम' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे की, प्रेरणा-विक्रम म्हणजेच प्रभास आणि पूजा एकमेकांसोबतचे किसिंग सीन मोजतात. त्यावेळी ९७ किसिंग सीन असल्याचे समोर येते. मात्र, हा चित्रपटाचा केवळ एक संवाद आहे, हे राधे श्याम पाहिल्यानंतरच कळेल, यात किती किसिंग सीन आहेत.राधे श्याम या चित्रपटातून पूजा आणि प्रभास पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना किती भावते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :प्रभासपूजा हेगडे