Join us

आरारारारा...खतरनाक! प्रवीण तरडेंची पत्नीदेखील आहे अभिनेत्री, दिसते लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 7:00 AM

प्रवीण तरडेंच्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे की त्यांची पत्नीदेखील अभिनेत्री आहेत.

मुळशी पॅटर्न चित्रपटातून दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले. प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट चांगलाच गाजला. सत्याची जाणीव करून देणारा मुळशी पॅटर्न हा चित्रपट होता. या चित्रपटात प्रवीण तरडे यांची भूमिका छोटी असली तरी खूप महत्त्वाची होती म्हणून या चित्रपटातील त्याचे अभिनयाचे विशेष कौतुक झाले. त्यांच्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. त्यांची पत्नीदेखील अभिनेत्री आहेत. 

प्रविण तरडे यांच्या पत्नीचे नाव स्नेहल आहे. प्रवीण तरडे एका सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील शेतकरी आहेत. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला अभिमान असल्याचे ते नेहमी आवर्जून सांगतात. आपल्या पत्नीसाठी प्रवीण तरडे सोशल मीडियावर बऱ्याचदा रोमँटिक पोस्ट लिहितात.

२ डिसेंबर २००९  साली प्रवीण तरडे व स्नेहल यांनी लग्न केले. दहा-बाय-दहाच्या खोलीत सुरु झालेला संसार तू थ्री बीएचकेसारखा मिरवलास. मग तुझ्याच पायगुणामुळे नंतर सगळे चित्रच बदलले, अशा शब्दांत प्रवीण तरडे यांनी पत्नीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहलसुद्धा अभिनेत्री आहेत. स्नेहल यांनी प्रवीण तरडे यांच्यासोबत काही नाटकात काम केले आहे आणि त्यासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला आहे. त्याचबरोबर स्नेहल यांनी प्रवीण यांच्यासोबत सोबत काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यात, देऊळबंद, चिंटू २ आणि व्हेंटिलेटर या चित्रपटांचा समावेश आहे.

प्रवीण तरडे यांचे संपूर्ण शिक्षण पुण्यात झाले. रंगमंचावर काम केल्यानंतर मालिका आणि चित्रपटांमध्ये आपले करियर करण्याचे त्यांनी ठरवले.

करिअरच्या सुरुवातीला प्रवीण तरडे यांनी कुंकू या मालिकेसाठी तब्बल एक हजार भागांचे लिखाण केले होते. ही मालिका सुपरहिट ठरली होती. प्रवीण आणि स्नेहल यांना एक मुलगा आहे.

प्रवीण तरडे यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर आता लवकरच ते सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावरील चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटाची कथा,सवांद, दिग्दर्शन स्वतः प्रवीण तरडेच करत आहेत. 

टॅग्स :प्रवीण तरडे