Join us

दोन्ही पत्नींबरोबर एकाच घरात राहतात सलीम खान, सावत्र आईबाबत अरबाज म्हणाला, "हेलन यांनी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 13:25 IST

सलीम खान आणि त्यांच्या पहिल्या पत्नीच्या नात्याबाबत अरबाज खानचं भाष्य, म्हणाला...

बॉलिवूडमधील खान कुटुंबीय त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतं. भाईजान सलमान खानचे वडील  सलीम खानदेखील अभिनेता आणि निर्माता आहेत. त्यांनी १९६४ साली सलमानची आई सलमा यांच्याशी विवाह केला. त्यानंतर १९८१ साली त्यांनी हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. तेव्हा सलीम हे अरबाज, सोहेल, सलमान आणि अलवीरा या चार मुलांचे वडील होते. दुसरी पत्नी हेलन यांचा कुटुंबीय स्वीकार करतील का, असा मोठा प्रश्न सलीम यांच्यापुढे होता. आता सलीम त्यांच्या दोन्ही पत्नी आणि कुटुंबीयांबरोबर एकाच घरात राहतात. नुकतंच अरबाजने यावर एका मुलाखतीत भाष्य केलं. 

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अरबाजने सावत्र आई हेलन यांच्यावर भाष्य केलं. तो म्हणाला, "हेलन यांनी कधीच आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही. मुलांना त्यांच्या आईची गरज आहे, हे त्यांना माहीत होतं. त्यांच्या जीवनातील महत्त्वाची व्यक्ती त्यांच्यासोबत राहते, यातच त्यांना आनंद होता. त्या व्यक्तीचं आधी एक कुटुंब आहे. त्याची पत्नी आणि मुलं आहेत, हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांना माझ्या वडिलांना त्रास द्यायचा नव्हता." 

"माणूस गेल्यावर त्याचं कुटुंबीय...", नितीन देसाईंच्या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना गश्मीरने सुनावलं

सलमा खान यांना सुरुवातीला या गोष्टीचा त्रास झाल्याचंही अरबाज खान म्हणाला. "माझ्या आईसाठी हे स्वीकारणं खूप कठीण होतं. पण, बाकी गोष्टी आणि मुलांमुळे ती आयुष्यात पुढे गेली. माझ्या आईवडील या परिस्थितीत अनेक गोष्टींना सामोरे गेले आहेत. त्यामुळेच आज आम्ही एकत्र राहत आहेत," असं त्याने सांगितलं. 

सुबोध भावेने केला पुणे मेट्रोने प्रवास, फोटो शेअर करत म्हणाला...

अरबाजने या मुलाखतीत त्याची आई सलमा खान आणि वडील खान सलीम खान यांच्या नात्याबबातही भाष्य केलं. तो म्हणाला, "माझ्या वडिलांना आईबरोबर वेळ घालवायला आवडतं. ते नेहमी तिचा हात पकडूनच बसतात. त्यांच्यातील हे प्रेम बघून मलाही आनंद होतो." 

टॅग्स :सलीम खानअरबाज खानहेलनसलमान खान