Join us

अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर सलीम खान म्हणाले, 'मी माझ्या मुलांच्या...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 20:14 IST

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. दोघे घटस्फोट घेत असल्याचे जेव्हा चाहत्यांना समजले तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्यावेळी सर्वांना त्यांच्यात नेमके काय घडले हे जाणून घ्यायचे. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला याबद्दल प्रश्न विचारला जात होता. यावेळी मलायका अरोराचे सासरे आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांनादेखील मलायका आणि अरबाज वेगळे का झाले असे विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी त्याबद्दल मोठे वक्तव्य केले होते.

अरबाज खान आणि मलायका अरोराच्या नात्यावर बोलताना सलीम खान यांनी सांगितले होते की, ते आपल्या मुलांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत नाही. ते म्हणाले होते, "मी एक लेखक आहे... मला कोणाच्या प्रेमप्रकरणाच्या किंवा विभक्त होण्याच्या बातम्यांबद्दल विचारू नका. मी माझ्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही."पुढे बोलताना सलीम खान म्हणाले की, मला याबाबत बोलायचे नाही. यासोबतच मलायकाची आई जोस पॉलीकार्प देखील या विषयावर बोलण्यास इच्छुक नव्हती. घटस्फोटाच्या बातमीबद्दल विचारले असता ती म्हणाली, "ते मोठे आहेत... हे त्यांचे काम आहे. मला त्यात हस्तक्षेप करायचा नाही. मला याबद्दल बोलायचे नाही."

अरबाज आणि मलायका १८ वर्षांनंतर झाले वेगळेअरबाज खान आणि मलायका अरोरा १८ वर्षांनंतर विभक्त झाले. अरबाज आणि मलायका यांना अरहान खान नावाचा मुलगा आहे. अरहान खान सध्या परदेशात शिक्षण घेतो आहे. दुसरीकडे अरबाज खान आणि मलायका अरोरा बद्दल सांगायचे झाले तर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. तर अरबाज खान जॉर्जियाला डेट करत आहे.

टॅग्स :मलायका अरोरासलीम खानअरबाज खान