Join us

अर्चना गौतम 'खतरो के खिलाडी'साठी सज्ज, बॅगमध्ये घेतलेल्या वस्तू ऐकून येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 16:24 IST

मिरची, आलं, ओवा अन् बरंच काही...

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा लोकप्रिय रिएलिटी शो 'खतरो के खिलाडी'च्या १३ (Khatron Ke Khiladi 13) व्या सिझनचे शूट लवकरच सुरु होणार आहे. मराठमोळा शिव ठाकरेही (Shiv Thakre) यामध्ये सहभागी होणार आहे. तसंच शिवसोबत हिंदी बिग बॉस १६ गाजवणारी अभिनेत्री अर्चना गौतमही (Archana Gautam) 'खतरो के खिलाडी'साठी सज्ज झाली आहे. यावेळी अर्चनाने काय काय तयारी केली आहे हे बघून तुम्हालाही प्रश्नच पडेल.

एका मुलाखतीत अर्चनाला विचारण्यात आलं की तू काय 'खतरो के खिलाडी'साठी काय तयारी केली आहेस. यावर अर्चना म्हणाली,"मी ओवा आणि मसाला घेतला आहे. तसंच मी मिर्ची, आलं घेतलं आहे. सर्दी आणि फ्लूपासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी मी हे घेतलं आहे. याशिवाय चहा पावडर, गाळणं, कॉफी मेकर, मेथी, मिक्सर हे देखील घेतलं आहे.

अर्चनाच्या पॅकिंगची ही लिस्ट ऐकून अभिनेत्री पूजा तिला विचारते 'अगं काय संसार थाटायचाय का तिकडे?' यावर अर्चना म्हणते,'मी काही पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर जाणार नाही. मी बराच वेळ टिकणार आहे. तसंच हे माझ्या आज्जीने सांगितलेले नुस्खे आहेत.'

खतरो के खिलाडी 13 ची सर्वांनाच उत्सुकता आहे. यावेळी कोणते स्टंट्स असणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

 

टॅग्स :खतरों के खिलाडीटिव्ही कलाकारबिग बॉस