Join us

आर्ची-परशाच्या प्रेमकहाणीची साक्षीदार स्थळे !

By admin | Published: May 14, 2016 11:25 PM

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाचे ९० टक्के चित्रीकरण करमाळा तालुक्यात उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात झाल्यामुळे ही रम्य स्थळे आता पिकनिक स्पॉट झाली आहेत.

नासीर कबीर, करमाळातरुणाईला वेड लावणाऱ्या आणि मराठी सिनेसृष्टीत कोट्यवधींची विक्रमी कमाई करणाऱ्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाचे ९० टक्के चित्रीकरण करमाळा तालुक्यात उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात झाल्यामुळे ही रम्य स्थळे आता पिकनिक स्पॉट झाली आहेत. या ठिकाणी भेटी देण्यासाठी युवकांची गर्दी वाढत आहे.पिस्तुल्या, फॅन्ड्री या यशस्वी आणि वास्तववादी चित्रपटानंतर ‘सैराट’ चित्रपटाची निर्मिती करणारे नागराज मंजुळे हे करमाळा तालुक्यातील जेऊर येथील रहिवासी आहेत. आपल्या तालुक्यातील निसर्गरम्य स्थळांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला व्हावी या उद्देशाने त्यांनी ‘सैराट’चे चित्रीकरण करमाळ्याच्या आसपासच्या परिसरात केले.सैराट चित्रपटात चित्रीत झालेल्या श्रीदेवीचामाळ येथील ९६ पायऱ्यांची महाकाय विहीर, सातनळाची विहीर त्याशिवाय वांगी भागातील उजनी जलाशय परिसर व पाण्याबाहेर आलेल्या जुन्या इमारती ही प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी राज्याच्या इतर भागातून हजारो पर्यटक विशेषत: युवा वर्ग मोठ्या प्रमाणात करमाळ्यात येऊ लागले आहेत. सैराट चित्रपटामुळे करमाळ्याचे नाव देशभर चर्चेत आले आहे. > रिंकूची आई जेऊरचीसैराट चित्रपटातील प्रमुख भूमिका असलेला नायक आकाश ठोसर हा मूळचा परंडा तालुक्यातील आलेश्वर येथील रहिवासी असून तो पैलवानगी करण्यासाठी जेऊर ता.करमाळा येथे आ.नारायण पाटील यांच्या तालमीत शिकत होता. नायिका अकलूज येथील रहिवासी असली तरी तिची आई मूळची जेऊर येथील आहे.येथे झाले चित्रीकरणसैराट चित्रपटाचे चित्रीकरण करमाळ्याचे ग्रामदैवत श्रीदेवीचामाळ येथील कमलाभवानी मंदिर, सभोवतालच्या ओवऱ्या, ९६ पायऱ्यांची विहीर, मंदिरातील उंच दीपमाळा, शहरातील किल्ला वेस, सातनळाची विहीर, त्या परिसरातील वठलेले लिंबाचे झाड, जि.प.चे विश्रामगृह, आशुतोष लॉज व परिसर, एस.टी.बसस्थानक, मौलालीनगर याशिवाय वांगी भागातील उजनी जलाशयातील पाणी कमी झाल्याने पाण्याबाहेर आलेला जुना वाडा, केम, कंदर व बिटरगाव-वां, जेऊरमधील चित्रीकरण, कंदर येथील बडे बागायतदार शंकरराव भांगे यांच्या शेतातील फार्महाऊस व शेती, देवळाली येथील धर्मराज राखुंडे यांची जुनी विहीर या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आलेले आहे.

नागराज यांचे पत्र्याचे घरसैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे जेऊर येथे इंदिरानगरमध्ये पत्र्याचे दोन खोल्यांचे जुने घर आहे. सैराट चित्रपटात नायक परशाच्या बरोबर असलेला सहकलाकार सल्या उर्फ सलीम अर्थात मूळ नाव आरबाज शेख हा जेऊर येथील रहिवासी व भारत महाविद्यालयात अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे. जवळपास ५० टक्के कलाकार करमाळा तालुक्यातीलच आहेत.

 

करमाळ्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या महाद्वारातून आर्ची, परशा, लंगड्या आणि सल्या पळून जातानाचे दृष्य चित्रीत केले आहे.

 श्रीदेवीचा माळ येथील ९६ पायऱ्यांच्या या शेकडो वर्षे जुन्या विहीवर ‘सैराट झालं जी..’ या गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले.आर्ची आणि परशा प्रेमभंग झाल्यावर करमाळ्यातील या सातनळ विहिरीच्या कठड्यावर गप्पा मारत बसतात.

करमाळ्यातील श्रीदेवीचा माळ येथील ९६ पायऱ्यांच्या विहिरीजवळ असलेल्या या पानझड झालेल्या या वृक्षावर बसून चित्रपटातील नायक परशा व आर्ची प्रेमाच्या गप्पा मारतात. हे झाड पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

‘सैराट झालं जी...’ या गाण्याचे चित्रीकरण कमलाभवानी देवीच्या मंदिरात या दीपमाळांमध्ये झाले आहे.करमाळ्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या महाद्वारातून आर्ची, परशा, लंगड्या आणि सल्या पळून जातानाचे दृष्य चित्रीत केले आहे.