रणबीर कपूर व आलिया भट यांच्या लग्नाच्या बातम्या येतात आणि हवेत विरतात. दोघांनीही रिलेशनशिपची कबुली दिलीये, पण लग्न वा साखरपुडा कधी होणार, हे मात्र कन्फर्म नाही. पण आता कदाचित आलिया व रणबीर गुपचूप साखरपुडा उरकण्याच्या तयारीत आहेत. सध्या चर्चा तरी तीच आहे.मंगळवारी आलिया व रणबीर मुंबई एअरपोर्टवर दिसले. रणबीरसोबत आलियाशिवाय नीतू कपूर, रिद्धीमा कपूर साहनी, तिचा नवरा आणि मुलगी सोबत दिसली. आलिया-रणबीर संपूर्ण कपूर कुटूंबासोबत रणथंबोरसाठी रवाना झाले आहेत. यानंतर काही वेळातच दीपिका पादुकोण व रणवीरही जयपूरला रवाना झालेत.
एवढेच नाही तर आलिया व रणबीरचा जिगरी दोस्त व दिग्दर्शक अयान मुखर्जीही मुंबई एअरपोर्टवर दिसला. इतके कमी की काय म्हणून महेश भट आणि आदर जैन आधीच रणथंबोर येथे पोहोचल्याचे कळतेय. करण जोहरही गोव्यात असून तो सुद्धा लवकरच रणथंबोरला पोहोचणार असल्याचे कळतेय.
आलिया व रणबीर, त्यांचे कुटुंबीय व जवळचे मित्र अचानक सगळेच्या सगळे रणथंबोरला पोहोचणे हा योगायोग नक्कीच नाही. हे सगळे न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी पोहोचल्याचे आधी मानले गेले होते. मात्र आता रणबीर व आलिया शिवाय त्यांचे सगळे जवळचे लोक रणथंबोरला पोहोचल्याने हा काहीतरी प्लान असल्याचे मानले जात आहे. कदाचित गुपचूप आलिया व रणबीरचा साखरपुडा वा रोका सारखी सेरेमनी इथे उरकण्याचा हा प्लान असावा, असे आता सर्वांना वाटतेय.
अद्याप खात्रीपूर्वक कुठलीही माहिती बाहेर आलेली नसती तरी रणबीर व आलियाचा साखरपुडा होणार, अशी चर्चा आहे. आता ही चर्चा खरी ठरते की खोटी ते बघूच. चर्चा खरी असेल तर लवकरच चाहत्यांना कळेल.वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर आलिया व रणबीर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात दिसणार आहे. यानंतर रणबीर संजय दत्तसोबत ‘शमशेरा’ या सिनेमातही झळकणार आहे. आलियाचे म्हणाल तर तिने संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चे शूटींगही सुरु केले आहे.
रणबीर कपूरच्या कुटुंबासोबत आलिया भट करणार न्यू इअर सेलिब्रेशन, प्राइवेट जेटने झाले रवाना