Join us  

OMG! विकी कौशल व कतरिना कैफने गुपचूप उरकला साखरपुडा; ‘रोका’ही झाला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 2:37 PM

कॅट व विकी या दोघांची रोका सेरेमनी आजच झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र या दोघांच्या घराबाहेर कोणतीच सजावट केलेली नाही.

ठळक मुद्दे2018 मध्ये ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये काऊचवर कतरिना बसली होती. नेहमीप्रमाणे करणने कॅटला प्रश्न केला होता. तुझ्यासोबत कोणत्या हिरोची जोडी परफेक्ट दिसेन? असा तो प्रश्न होता. यावर कतरिनाने विकी कौशल असे उत्तर दिले होते.

विकी कौशल (Vicky Kaushal ) व कतरिना कैफ (Katrina Kaif )  हे बॉलिवूडचे दोन लव्ह बर्ड्स सध्या जाम चर्चेत आहेत. गेल्या वर्षी या दोघांच्या डेटींगची चर्चा सुरू झाली होती. रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॅट सिंगल होती. अशात विकी तिच्या आयुष्यात आला आणि बघता बघता दोघेही एकमेकांत गुंतले. म्हणायला विकी व कतरिना दोघांनीही आपल्या रिलेशनशिपबद्दल मौन बाळगले आहे. पण काही दिवसांपूर्वी अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरने  सांगायचे ते सांगितले होते. विकी व कतरिना सोबत आहेत आणि हे खरे आहे, असे म्हणत त्याने दोघांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केले होते. आता काय तर कतरिना व विकीने गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर दोघांचा रोका सेरेमनी झाल्याचेही कळतेय. ( Are Vicky Kaushal and Katrina Kaif secretly engaged)

 सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने याबाबत  ट्विटरवर एकपोस्ट केली आहे. ‘कतरिना व विकीने साखरपुडा केल्याची अफवा आहे. दोघांनी रोका केल्याचेही म्हटले जातेय. अधिकृत घोषणेची प्रतीक्षा. तोपर्यंत ही अफवा समजावी,’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.  या दोघांची रोका सेरेमनी आजच झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र या दोघांच्या घराबाहेर कोणतीच सजावट केलेली नाही.अद्याप कॅट वा विकीने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अशी सुरू झाली होती लव्हस्टोरीकॅट व विकी यांना जवळ आणण्यात करण जोहरचे   मोठे योगदान आहे. होय, करण जोहर एक मोठा निर्माता व दिग्दर्शक आहे. सोबत बॉलिवूड पार्ट्यांचा खास होस्टही आहे. करणच्या पार्टीमध्ये अनेकदा विकी व कॅट दिसले आहेत. विकी व कॅटच्या रिलेशनची सुरूवात एकार्थाने करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये झाली होती.

2018 मध्ये ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये काऊचवर कतरिना बसली होती. नेहमीप्रमाणे करणने कॅटला प्रश्न केला होता. तुझ्यासोबत कोणत्या हिरोची जोडी परफेक्ट दिसेन? असा तो प्रश्न होता. यावर कतरिनाने विकी कौशल असे उत्तर दिले होते. यानंतर यानंतरच्या ‘कॉफी विद करण’च्या एपिसोडमध्ये विकी व आयुष्यमान खुराणा सहभागी झाले होते. यावेळी करणने अगदी आठवणीने कतरिनाची ही गोष्ट विकीला सांगितली होती.   मी आनंदाने बेशुद्ध पडेन, असे ही गोष्ट ऐकल्यानंतर विकी म्हणाला होता. ‘कॉफी विद करण’च्या या एपिसोडनंतर जवळजवळ वर्षभरानंतर खरोखर विकी व कतरिना सोबत दिसू लागले होते.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल