गेल्या काही दिवसापूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचे नाव पोर्नोग्राफी संदर्भातील व्यवयातील प्रकरणात आले होते. या संदर्भात राज कुंद्रा याला पोलिसांनी ताब्यातही घेतले होते.
यावेळी शिल्पा राजच्या घटस्फोटाची अफवाही पसरली होती. या चर्चेवर राज कुंद्रा आणि शिल्पाने मौन पाळले. पण राज कुंद्राने या संदर्भातील एका कमेंटला प्रत्युत्तर दिले आहे.
ट्विटरवर एका युझरने राज कुंद्राला त्यांच्या लग्नावर प्रश्न विचारला - तुम्ही आणि शिल्पा एकत्र आहात का? यावर राज कुंद् यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "हाहाहा. मला हा प्रश्न आवडला. प्रेम हे कृत्य नाही आणि ते ढोंग करता येत नाही. २२ नोव्हेंबर रोजी १३ वी अॅनव्हर्सरी आहे, आम्हाला शुभेच्छा द्यायला विसरू नका." असं प्रत्युत्तर राज याने दिले आहे. राजचे हे उत्तर अनेक नेटकऱ्यांना आवडले आहे.
पॉर्न प्रकरणी राज कुंद्रा आता उघडपणे आपली बाजू मांडत आहेत. काही दिवसापूर्वी राज कुंद्रा सोशल मीडियापासून दूर होते. काही महिन्यांनी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राजने हळूहळू सोशल मीडियावर सक्रीय झाले.
२१ सप्टेंबर २०२१ रोजी राज कुंद्राचे नाव पोर्नोग्राफी प्रकरणात समोर आले. त्यांना अनेक आठवडे तुरुंगात काढावे लागले. पत्नी शिल्पा शेट्टीने पतीवरील संकट दूर करण्यासाठी अनेक मंदिरांमध्ये फेऱ्या मारल्या होत्या. कठीण काळात शिल्पा पती राज कुंद्राच्या पाठीशी ढाल बनून उभी राहिली.
राज यांनी नेहमीच आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे, कायदा न्याय देईल आणि सत्य लवकरच बाहेर येईल असंही राज याने म्हटले आहे.