Join us

आईच्या आठवणीने अर्जुन-अंशुला व्याकूळ

By admin | Updated: March 27, 2016 02:13 IST

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला या दोघांनीही शुक्रवारी आईला श्रद्धांजली वाहिली. चार वर्षांपूर्वी अर्जुन-अंशुलाची आई मोना कपूर यांचे निधन झाले होते.

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला या दोघांनीही शुक्रवारी आईला श्रद्धांजली वाहिली. चार वर्षांपूर्वी अर्जुन-अंशुलाची आई मोना कपूर यांचे निधन झाले होते. अर्जुन व अंशुला आईच्या आठवणीने व्याकूळ झालेले दिसले. दोघांनीही आईसोबतचे बालपणीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. शिवाय मनाला स्पर्शून जाणारा संदेशही त्याखाली लिहिला. मोना कपूर बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी होत्या. कर्करोगाशी लढत असतानाच मोना यांचे २५ मार्च २०१२ रोजी निधन झाले. १९९६मध्ये मोना यांना घटस्फोट दिल्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी विवाह केला होता.