छैय्या छैय्या गर्ल अभिनेत्री मलायका अरोरा(Malaika Arora) आणि अभिमेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor)यांच्या अफेयरच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगल्या आहेत. दोघांचं एकत्र दिसणं, फिरणं यांत काही नवं राहिलं नाही.अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे नाव इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. सतत दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसतात. एकमेकांसाह फिरताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या चर्चा या होतच असतात. दोघाचे अफेअर हे जगजाहीर असले तरी लग्न कधी करणार याकडेच त्यांच्या चाहत्यांचे लक्ष असते. अजूनतरी दोघांच्या लग्नाचे काही प्लॅनिंग नाही असेच दिसतंय. एरव्ही सोशल मीडियावर मलायका आणि अर्जुनला अनेकदा ट्रोल केले जाते.
दोघांना ट्रोल करण्याचे कारण म्हणजे त्यांच्या वयातले अंतर. दोघांमध्ये १२ वर्षाचे अंतर असल्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. सततच्या या ट्रोलिंगमुळे खरं तर दोघांना अजिबात फरक पडत नाही. मलायकानेही यापूर्वी अर्जुनसोबतच्या रिलेशनबाबत विविध खुलासे केले होते.जीवनात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळाली असं समजावं असं सांगत मलायकाने अर्जुनसोबतच्या चांगल्या संबंधांची अप्रत्यक्ष कबुलीच दिली होती. आता अर्जुन कपूरने पहिल्यांदाच ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.अर्जुन कपूर म्हणतो,सोशल मीडियावर ट्रोल करणे यात काही नवीन नाही. आम्हाला वयाच्या अंतरामुळे ट्रोल केले जाते खरचं किती बालिश वागतात लोकं.अधिकतर लोकांच्या कमेंट्स आम्ही वाचतही नाही. त्याकडे दुर्लक्षच करतो. जे सोशल मीडियावर आम्हाला ट्रोल करतात. तेच आम्हाला भेटल्यावर आमच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपड करत असतात. दुसरीकडे आम्हालाच नाव ठेवतात.
अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अर्जुन कपूर चित्रपट निर्माते मोहित सुरीच्या (Mohit Suri) 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अर्जुनसोबत जॉन अब्राहम (John Abraham) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यासोबतच अर्जुन कपूर चित्रपट निर्माता विशाल भारद्वाज यांच्या 'कुट्टे' या चित्रपटातही दिसणार आहे.