Join us  

‘Pushpa 2’मध्ये फहाद फासिलच्या जागी अर्जुन कपूरची एन्ट्री? निर्मात्यानं केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2022 10:21 AM

‘पुष्पा’ नंतर प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) या सिनेमाची. ‘पुष्पा 2’वर काम सुरू झालं आहे आणि चर्चेचा बाजार गरम आहे...

पुष्पा’ नंतर प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) या सिनेमाची. ‘पुष्पा 2’वर काम सुरू झालं आहे आणि चर्चेचा बाजार गरम आहे. चित्रपटाबद्दल रोज नव्या बातम्या, काही अफवा कानावर पडत आहेत. ‘पुष्पा 2’मध्ये अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) मनोज वाजपेयी काम करणार असल्याची बातमी सर्वप्रथम आली होती. आता एक नवी बातमी कानावर येतेय. होय, ‘पुष्पा 2’मध्ये अल्लू अर्जुनसोबतअर्जुन कपूरची ( Arjun Kapoor) वर्णी लागल्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘पुष्पा 2’चे दिग्दर्शक सुकुमार अर्जुन कपूरच्या संपर्कात असून तो या चित्रपटात फहाद फासिलने (Fahadh Faasil )साकारलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसल्याचं म्हटलं जात आहे. ‘पुष्पा 2’मध्ये अर्जुन कपूर दिसणार म्हटल्यावर त्याचे चाहते क्रेझी झाले आहेत. पण खरं काय? हे कळायला मार्ग नव्हता. तर आता त्याचाही खुलासा झाला आहे. ‘पुष्पा 2’चे निर्माते नवीन यरनेनी यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे.‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत नवीन यरनेनी यांनी यावर भाष्य केलं. ‘पुष्पा 2’मध्ये अर्जुन कपूरची फहाद फासिलची जागा घेणार? हे खरं आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ही निव्वळ अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं.

 ही चुकीची बातमी आहे. ‘पुष्पा 2’मध्येही फहाद फासिल हाच पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करणार आहे. तुमच्याकडे 100 टक्के चुकीची माहिती आहे. आम्ही या महिन्याच्या अखेरिस ‘पुष्पा 2’चं शूटींग सुरू करत आहोत. आधी हैदराबादेत शूटींग होईल आणि यानंतरचा सीक्वेन्स जंगलात शूट होईल. नंतर अन्य लोकेशन्सवर, असं त्यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा 2’मध्ये साऊथ स्टार साई पल्लवीची वर्णी लागली असल्याची बातमी आली होती. ही बातमीही अफवा असल्याचं नवीन यांनी स्पष्ट केलं. ‘पुष्पा 2’मध्ये मुख्य भूमिकांमधील एकही कलाकार बदलेला नाही. पहिल्या पार्टमध्ये जे कलाकार दिसले तेच दुसऱ्या पार्टमध्ये दिसतील. पुष्पाची भूमिका अल्लू अर्जुन साकारेल आणि रश्मिका मंदाना त्याच्या प्रेयसीची. फहाद फासिल हा भैरवसिंग शेखावत या पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत दिसेल, असंही त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :अर्जुन कपूरपुष्पाअल्लू अर्जुनTollywood