रोहित शेट्टीच्या आगामी बहुप्रतिक्षित 'सिंघम अगेन' मध्ये मोठी स्टारकास्ट आहे. अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ या स्टार अभिनेत्यांनंतर अर्जुन कपूरच्या एन्ट्रीचीही घोषणा झाली. यामध्ये तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे. त्याचा लूक पाहून सर्वच सिनेप्रेमी कौतुक करत आहेत. याविषयी अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य चोप्रा आणि रोहित शेट्टीने माझ्यावर विश्वास टाकला याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी आहे असं तो म्हणाला.
अर्जुन कपूर म्हणतो, “इशकजादे, औरंगजेब यांसारख्या सिनेमात नकारात्मक छटा असलेल्या व्यक्तिरेखा साकारून मी इंडस्ट्रीत माझ्या करिअरची सुरुवात केलीय. इतक्या वर्षांनंतर मी पुन्हा सिंघममध्ये खलनायकाची भूमिका साकारत आह. आदित्य चोप्राने माझ्यामध्ये अशी पात्र करण्याची क्षमता पाहिली होती आणि आता महत्त्वाकांक्षी कॉप युनिव्हर्स चित्रपटात मी खलनायकाची भूमिका करू शकतो असा विश्वास दिल्याबद्दल मी रोहित शेट्टीचा आभारी आहे. रोहित शेट्टीने माझ्यावर विश्वास दर्शवला आणि प्रत्येक टप्प्यावर तो मार्गदर्शक ठरला.”
अर्जुन पुढे म्हणतो, "हे दोघंही माझ्या चित्रपट कारकिर्दीत खरे मार्गदर्शक आहेत आणि मी कृतज्ञ आहे की रोहित शेट्टी सारख्या हिट मशीन चित्रपट निर्मात्याचा विश्वास आहे की मी सिंघम अगेनमध्ये खलनायकाची भूमिका करून लोकांना आश्चर्यचकित करू शकतो."
अभिनेत्याचे म्हणणे आहे की रोहित शेट्टीच्या चित्रपटात खलनायकाची भूमिका करणे त्याच्यासाठी रोमहर्षक आहे कारण यामुळे त्याला अभिनेता म्हणूनही प्रयोग करण्याची संधी मिळाली.
अर्जुन म्हणतो, “मला नेहमीच पडद्यावर प्रयोग करायचे होते आणि प्रेक्षकांना काहीतरी वेगळे पाहायला हवे होते. त्यामुळे सिंघम अगेनमध्ये पोलिसांच्या कट्टर शत्रूची भूमिका करणे ही माझ्यासाठी एक रोमांचक संधी होती.”
तो पुढे म्हणतो, “मी म्हटल्याप्रमाणे, जेव्हा मी सिंघम अगेनच्या सेटवर असतो तेव्हा माझ्या करिअरमध्ये पूर्ण वर्तुळ असल्यासारखे वाटते. माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात नकारात्मक भूमिका साकारून मला खूप प्रेम मिळाले आणि मला सिंघम अगेनमध्येही असेच आणि आणखी बरेच काही मिळवायचे आहे.”