Join us

अर्जुन रामपाल, रणदीप हुड्डा लढणार एकमेकांविरुद्ध

By admin | Published: January 20, 2017 2:29 AM

जगातील पहिली संमिश्र मार्शल आर्टस् (एमएमए) सुपर फाईट लीगचे (एसएफएल) आयोजन भारतात करण्यात आले

जगातील पहिली संमिश्र मार्शल आर्टस् (एमएमए) सुपर फाईट लीगचे (एसएफएल) आयोजन भारतात करण्यात आले आहे. मार्शल आर्ट्सच्या मैदानात बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन, अर्जुन रामपाल व रणदीप हुड्डा एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. सुपर फाईट लीग या स्पर्धेतील संघ या तीन अभिनेत्यांनी विकत घेतले आहेत. अर्जुन रामपाल, अजय देवगन, सलीम मर्चंट व रणदीप हुड्डा यांनी दिल्ली संघ विकत घेतला आहे. ‘सुपर फाईट लीग’ या स्पर्धेत दिल्ली, उत्तरप्रदेश, मुंबई, हरयाणा, बंगळुरू, पंजाब, पुणे आणि गोवा हे आठ संघ सहभागी होणार आहेत. यात अनूप कुमार, सीजे सिंह, अमित राय, ध्रुव चौधरी सारखे मार्शल आर्ट फायटर भाग घेणार आहेत. प्रत्येक टीममध्ये नऊ भारतीय व तीन आंतरराष्ट्रीय फायटर्स समाविष्ट असतील. महिला खेळाडूंना देखील समान संधी मिळणार आहे. यात एकूण ९६ फायटर सहभागी होणार आहेत.