Join us

वयाच्या ५० व्या वर्षी चौथ्यांदा बाबा बनणार अर्जुन रामपाल, लग्न न करता गॅब्रिएला होणार दुसऱ्यांदा आई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 4:05 PM

अर्जुन चौथ्यांदा बाबा होणार आहे. ही माहिती त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने तिच्या सोशल अकाउंटवरून दिली आहे. गॅब्रिएला आणि अर्जुन रामपालने अजून लग्न केलेले नाही.

अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. यावेळीही तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अर्जुन राजपालची गर्लफ्रेंड आणि दक्षिण आफ्रिकेची मॉडेल गॅब्रिएला डेमिट्रिएड्स(Gabriella Demetriades)ने पोस्ट शेअर सांगितले आहे की ती लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे.  तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची माहिती सोशल मीडियावर शेअर करताना गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील काही खास फोटोही शेअर केले आहेत.तिची ही पोस्ट पाहून अनेक सेलेब्स तिचे आणि अर्जुनचे अभिनंदन करत आहेत. अर्जुन ५० व्या वर्षी चौथ्यांदा बाबा होणार आहे. 

अर्जुनला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. मेहर जेसिका आणि अर्जुनने एकमेकांसोबत 20 वर्ष संसार केला. पत्नी मेहर जेसिकासोबत विभक्त झाल्यानंतर अर्जुन गॅब्रिएलात गुंतला. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. यानंतर अनेक इव्हेंटला दोघे एकत्र दिसू लागले. गॅब्रिएला एक आफ्रिकी मॉडेल आहे. ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण  बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.

पहिली पत्नी मेहरला घटस्फोट दिल्यानंतर अर्जुन गॅब्रिएला डेमिट्रिएड्ससोबत  (Gabriella Demetriades)राहतोय.  पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर अर्जुनने गॅब्रिएलासोबतचे रिलेशनशिप जगजाहिर केलं होतं. अर्जुन व ग्रॅबिएला दोघांनी लग्न केलेलं नाही. पण लग्नाआधीच ती अर्जुनच्या मुलाची आई झाली आहे. मुलं झाल्यानंतर तरी अर्जुन व गॅब्रिएला लग्न करतील, असा चाहत्यांचा अंदाज होता. पण हे लग्न कधीच होणार नाही.  मी व गॅब्रिएला लग्न करणार नाही, असं अर्जुनने स्पष्ट सांगितलं होतं. 

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन त्याच्या व त्याची पार्टनर गॅब्रिएलाबद्दल बोलला होता. मी आणि गॅब्रिएला आम्ही दोघांनी लग्न न करता मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला, तो एक मोठा निर्णय होता. या निर्णयानंतर अनेक स्तरावर आमच्या नात्यावर प्रतिक्रिया उमटल्या. पण त्यामुळे काहीही फरक पडला नाही. तुम्ही एक पब्लिक पर्सन आहात म्हटल्यावर तुमच्याबद्दल लोक बोलणारच. दुसरे काय विचार करतात, यापेक्षा आम्ही  आमच्या पर्सनल लाईफमधील गोष्टी एन्जॉय करतो, असं अर्जुन म्हणाला होता. 

टॅग्स :अर्जुन रामपाल