बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तब्बल 14 वर्षानंतर कमबॅक करतेय. तिचे दोन बिग बजेट सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. त्याआधीच काल शिल्पाचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला (Raj Kundra) अटक करण्यात आली आणि शिल्पा नेटक-यांच्या निशाण्यावर आली. अश्लील चित्रपटांची निर्मिती प्रकरणी राजला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि यानंतर शिल्पा कधी नव्हे इतकी ट्रेंडमध्ये आली. राजसोबत शिल्पाला सुद्धा नेटक-यांनी ट्रोल करणे सुरू केले. तिच्यावर आणि राज कुंदावरचे मीम्सही व्हायरल झालेत. (with the arrest of Raj Kundra now Shilpa Shetty is trending on top in twitter)
‘बिच्चारी शिल्पा शेट्टी योगा करण्यात बिझी होती आणि तिकडे तिचा पती राज कुंद्रा पॉर्न बनवण्यात बिझी झाला’, अशा शब्दांत एका युजरने शिल्पा व राजची खिल्ली उडवली. अनेकांनी शिल्पाला तिच्या ‘सुपर से उपर’ या नेहमीच्या डायलॉगवरूनही ट्रोल केले. ‘ये तो सुपर से भी उपर निकला,’ असे एका युजरने लिहिले.बुर्ज खलिफा में फ्लॅट इसी पैसे से लिया था क्या? असा सवाल करत एका युजरने शिल्पाला ट्रोल केले.
शिल्पाच्या अडचणी वाढणार?शिल्पा शेट्टी 15 वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. हंगामा 2 आणि निकम्मा या दोन सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र आता पती राजला अटक झाल्याने याचा थेट परिणाम तिच्या या दोन्ही चित्रपटांवर पडू शकतो. येत्या 23 तारखेला शिल्पाचा ‘हंगामा 2’ हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होऊ शकतो. ‘निकम्मा’ची रिलीज डेट अद्याप यायची आहे. तूर्तास शिल्पा ‘सुपर डान्सर’ हा रिअॅलिटी शो जज करतेय. पतीच्या अटकेनंतर ती या शोमध्ये दिसणार की नाही? असा प्रश्नही विचारला जातोय. एकंदर काय तर राजच्या कर्माची शिक्षा कदाचित शिल्पाला मिळू शकते.