Join us

उद्धटपणा भोवला! रानू मंडल पुन्हा रस्त्यावर गाण्यासाठी झाली लाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 19:47 IST

लोकप्रियता मिळाल्यानंतर रानू मंडलला चित्रपटात गाणे गाण्याची संधी मिळाली पण, यश जास्त काळ टिकू शकले नाही.

कधी कुणाचे नशीब फळफळेल हे सांगता येत नाही. असेच काहीसे रानू मंडलच्या बाबतीत घडले आहे. काही सेकंदात तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रानू मंडलचे आयुष्यच बदलून गेले आणि एका रात्रीत ती लोकप्रिय झाली. रानू मंडलला तिच्या आवाजामुळे असंख्य चाहते मिळाले. मात्र एक प्यार का नगमा है गाणे गाऊन लोकप्रिय झालेल्या रानू मंडलच्या जीवनात पुन्हा एकदा अंधार पसरला आहे.

लोकप्रियता मिळाल्यानंतर रानू मंडलला चित्रपटात गाणे गाण्याची संधी मिळाली पण, यश जास्त काळ टिकू शकले नाही. आता रानू पुन्हा एकदा रस्त्यावर आली आहे. नुकतीच रानू मंडलचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती कारच्या समोरा माइक पकडून लता मंगेशकर यांचे गाणे गाताना दिसत आहे. पुन्हा एकदा ती जुन्या वेशात दिसते आहे. आता हा व्हिडीओ पाहून युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे.

एका हातात झोला पकडून रानू मंडल दुसऱ्या हातात माइक पकडून गाणे गाताना दिसतात. यावर युजर्सने प्रतिक्रिया देत लिहिले की, सिंगर तर ठीक आहे पण तिचा उद्धटपणा भोवला. दुसऱ्या युजरने लिहिले की, आता हिला पाहणे कोणाला आवडत नाही आणि ना ही ऐकायला. काही युजर्सने हेपण म्हटले की, माणसाकडून चूक होते आणि त्याला आणखी एक संधी देता येते.

रानू मंडलचा पश्चिम बंगालच्या राणा घाट रेल्वे स्टेशनवर एका व्यक्तीने व्हिडीओ बनवला होता ज्यात ती लता मंगेशकर यांचे एक प्यार का नगमा हे गाणे गाताना दिसत होती. हा व्हिडीओ एका रात्रीत व्हायरल झाला होता आणि रानू मंडल एका रात्रीत स्टार झाली होती. तिच्या गाण्याची सगळीकडे चर्चा झाली होती. त्यानंतर तिला संगीतकार आणि गायक हिमेश रेशमियाने हॅप्पी हार्डी अँड हीरमध्ये गाण्याची संधी दिली होती. त्यानंतर चाहत्यांनी सेल्फी मागितल्यानंतर ती चिडली होती. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

टॅग्स :राणू मंडलहिमेश रेशमिया