Join us

'मुन्ना भाई MBBS नंतर माझं आयुष्य बर्बाद...', सर्किट या भूमिकेबद्दल अर्शद वारसीच्या मनात होती वेगळीच भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 4:58 PM

२००३ मध्ये आलेल्या 'मुन्ना भाई एमबीबीएस' या कॉमेडी ड्रामा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आजही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही.

२००३ मध्ये आलेल्या 'मुन्ना भाई एमबीबीएस' या कॉमेडी ड्रामा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आजही या चित्रपटाची क्रेझ कमी नाही. चित्रपटांचा विचार केला तर मुन्नाच्या बेस्ट फ्रेंड 'सर्किट'चा उल्लेख कसा होणार नाही. मुन्नापेक्षाही सर्किटने आपल्या व्यक्तिरेखेने लोकांची मने जिंकली होती. अर्शद वारसीने 'मुन्ना भाई एमबीबीएस'मध्ये सर्किटची भूमिका साकारली होती. अर्शदने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तो त्याच्या सर्किट रोलसाठी प्रसिद्ध आहे. तथापि, तुम्हाला माहित नसेल की हा चित्रपट करण्यापूर्वी, अभिनेत्याने हे मान्य केले होते की इंडस्ट्रीतील त्याचे करिअर संपले आहे. तो त्याचा शेवटचा चित्रपट मानत होता.

नुकतेच अर्शद वारसीने एका ताज्या मुलाखतीत हे धक्कादायक विधान केले आहे. या चित्रपटानंतर आपलं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं अर्शद सांगतो. सिद्धार्थ कन्ननसोबतच्या संभाषणात अर्शदने 'मुन्ना भाई एमबीबीएस'बद्दल सांगितले की, हा चित्रपट केल्यावर माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, हे मला माहीत होते. ते पूर्ण झाले. माझ्या करिअरमधील हा शेवटचा चित्रपट आहे. नायकाला फॉलो करणारे ५ लोक कोणाला आठवतात. चित्रपट चालला तरी माझे नुकसान आहे, नाही चालला तरी माझे नुकसान आहे. मला वाटत नाही की संजूलाही पहिल्या चित्रपटात इतका आत्मविश्वास होता. हळूहळू आम्हाला ते जाणवू लागले. कारण त्या काळात चित्रपट वेगळ्या पद्धतीने बनवले जात होते आणि हा वेगळा चित्रपट होता.अर्शद वारसी सध्या त्याच्या 'असुर २' या वेब सीरिजचे प्रमोशन करत आहे. अलीकडेच जिओ सिनेमावर प्रदर्शित झालेल्या या मालिकेला खूप पसंती दिली जात आहे. वेब शोमध्ये बरुण सोबती देखील मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :अर्शद वारसी