Join us

अर्शद वारसीचा लेकही आहे अभिनेता; 'छोटा सर्किट'ने केलंय 'सलाम नमस्ते'मध्ये काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 15:00 IST

Arshad warsi son: वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्शदच्या लेकानेही  बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

संजय दत्तच्या मुन्नाभाई MBBS या सिनेमात सर्किट ही भूमिका साकारुन विशेष लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे अर्शद वारसी (Arshad Warsi). आजवरच्या कारकिर्दीत अर्शदने अनेक गाजलेल्या सिनेमात काम केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचा बऱ्यापैकी चांगला चाहतावर्ग आहे. विशेष म्हणजे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्शदच्या लेकानेही  बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. हळूहळू करत अर्शदचा लेक इंडस्ट्रीमध्ये त्याचं स्थान निर्माण करायचा प्रयत्न करत आहे.

सध्या सोशल मीडियावर अर्शदच्या लेकाची चर्चा रंगली आहे. अर्शद्या मुलाचं नाव जेके वारसी असं असून तो छोटा सर्किट या नावाने ओळखला जातो. जेके १८वर्षांचा आहे. अलिकडेच जेकेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यात त्याने त्याचा फ्युचर प्लॅन सांगितला. तेव्हापासून त्याच्या बॉलिवूड डेब्युची चर्चा सुरु झाली आहे.

"मी प्रोडक्शनसंदर्भात अनेक कामे केली आहेत. पण, मला वडिलांप्रमाणे अभिनेता व्हायचं आहे. पण, सध्या मला अभिनयातले काही बारकावे शिकायचे आहेत त्यावर सध्या माझं कामही सुरु आहे", असं जेके म्हणाला.

दरम्यान, अर्शद आणि मारिया गोरेटी यांचा लेक असलेल्या जेके याने सलाम नमस्ते सिनेमात काम केलं आहे. तसंच या व्यतिरिक्त तो २०१४ मध्ये रिलीज झालेल्या Calling Mr. Joe B Carvalho या सिनेमात झळकला होता. 

टॅग्स :अर्शद वारसीबॉलिवूडसेलिब्रिटीसंजय दत्त