Join us

आता बास्स झालं, त्याने माफी मागावी; कृष्णा अभिषेक- गोविंदाच्या भांडणावर बोलली आरती सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 5:49 PM

Arti Singh On Krushan Abhishek Govinda Fight : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक या मामा-भाच्यातील वाद अद्यापही संपलेला नाही. या ना त्या निमित्ताने अनेकदा हा वाद उफाळून येतो.

Arti Singh On Krushan Abhishek Govinda Fight :  बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि कृष्णा अभिषेक (Krushan Abhishek)  या मामा-भाच्यातील वाद अद्यापही संपलेला नाही. या ना त्या निमित्ताने अनेकदा हा वाद उफाळून येतो. मग एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप, खुलासे असं सगळं घडताना दिसतं. काही महिन्यांपूर्वीच  गोविंदा व त्याची पत्नी सुनीता ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणार म्हटल्यावर, कृष्णाने हा एपिसोड करण्यास स्पष्ट नकार दिला होता.  कृष्णाच्या या वागण्यानं मामी सुनीता जाम भडकली होती आणि यापुढे मला त्याचं थोबाडंही पाहायचं नाही, असं म्हणून तिनं आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली होती. आता या संपूर्ण एपिसोडवर कृष्णाची बहिण आरती सिंग (Arti Singh) हिची प्रतिक्रिया आली आहे. होय, आता बास्स झालं, कृष्णानं मामाची माफी मागितली पाहिजे, असं तिने म्हटलं आहे.

DNAला दिलेल्या मुलाखतीत आरतीने दोन्ही कुटुंबातील वादावर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, माझ्या मते कृष्णा लहान आहे. त्यामुळे त्याने मामाची माफी मागायला हवी आणि मामांनी वडिलधारी या नात्याने त्याला माफ करायला हवं. कुटुंब हे देवाने दिलेली सुंदर भेट आहे. परमेश्वराच्या रूपाने एका चांगल्या कुटुंबात आमचा जन्म झाला आहे. कुटुंब आनंदात एकत्र असेल तर यापेक्षा वेगळं काय हवं.

मी या प्रकरणात बोलत नाही पण आता...मी कधीही दोन्ही कुटुंबातील भांडणात मध्यस्थी करत नाही. पण आता बास्स झालं. आयुष्य खूप लहान आहे आणि या आयुष्यात आनंद महत्त्वाचा आहे. माझ्यासोबतही कुणी बोलत नव्हतं. पण ठीक आहे, मला त्याबद्दल काहीही अडचण नाहीये, असं आरती सिंग म्हणाली. आरती सिंग प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आहे. आरतीने 2007 साली मायका या मालिकेतून कारकीर्दीची सुरूवात केली होती.

असं सुरु झालं होतं भांडणकृष्णा व गोविंदा यांच्या वादाचं कारण ठरलं होतं एक ट्वीट. कृष्णाची पत्नी कश्मीरा शाहने  एक ट्वीट केलं होतं. त्यात लोक पैशांसाठी नाचतात असा उल्लेख करण्यात आला होता. हे ट्वीट गोविंदासाठी केलं असा गोविंदाच्या कुटुंबियांचा समज झाल्याने त्यांनी कृष्णाच्या कुटुंबियांशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कश्मीराने हे ट्वीट नणंद आरती सिंग साठी (कृष्णाची बहीण) टाकलं होतं, असं स्पष्टीकरण कृष्णाने  दिलं होतं.

टॅग्स :आरती सिंगकृष्णा अभिषेकगोविंदा