यामी गौतम मुख्य भूमिकेत असलेला 'आर्टिकल ३७०' सिनेमा २३ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला होता. काश्मीरमधून आर्टिकल ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा या सिनेमातून मागोवा घेण्यात आला. याचा इतिहास मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न 'आर्टिकल ३७०' सिनेमातून करण्यात आला. 'आर्टिकल ३७०' सिनेमाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने चांगली कमाई केली होती. आता बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
'आर्टिकल ३७०' दोन महिन्यांनी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. शुक्रवारी म्हणजेच १९ एप्रिलला यामी गौतमचा 'आर्टिकल ३७०' ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे आता हा सिनेमा प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.
यामीबरोबरच या सिनेमात मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी महत्त्वाच्या भूमिकेत होता. 'आर्टिकल ३७०' सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य जांभळे यांनी केलं आहे. तर आदित्य थार आणि लोकेश थार यांनी निर्मिती केली आहे. यामी आणि वैवभबरोबर या सिनेमात प्रिया मणि, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल यांच्या मुख्य भूमिका आहेत. अरुण गोविल या सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत आहेत.