Join us

'बीचवाले – बापू देख रहा है'मधील कलाकारांनी दिला आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 13:02 IST

सोनी सबवरील आगामी मालिका 'बीचवाले – बापू देख रहा है'च्‍या वास्‍तविक व पडद्यावरील जीवनात, मध्‍यमवर्गीय कुटुंबातील असलेल्‍या कलाकारांनी त्‍यांच्‍या काळात गोष्‍टी कशा होत्‍या आणि आजचा व पूर्वीचा काळ यामध्‍ये काय फरक आहे, याबाबत आपले मत व्‍यक्‍त केले.

सोनी सबवरील आगामी मालिका 'बीचवाले – बापू देख रहा है'च्‍या वास्‍तविक व पडद्यावरील जीवनात, मध्‍यमवर्गीय कुटुंबातील असलेल्‍या कलाकारांनी त्‍यांच्‍या काळात गोष्‍टी कशा होत्‍या आणि आजचा व पूर्वीचा काळ यामध्‍ये काय फरक आहे, याबाबत आपले मत व्‍यक्‍त केले.  

सोनी सबवरील आगामी मालिका 'बीचवाले – बापू देख रहा है'मध्‍ये  बॉबीची भूमिका साकारणारा झाकिर हुसैन म्‍हणाला, ''असा काळ होता, जेव्‍हा ४००० रुपये देखील एका महिन्‍यासाठी पुरेसे होते. पण मी मुंबईत यायचो तेव्‍हा २०,००० रुपये देखील कमी पडायचे. त्‍याकाळी आमच्‍याकडे घरात फोन असायचे आणि आम्‍ही एका डायरीमध्‍ये फोन नंबर लिहून ठेवायचो आणि ते  लक्षात देखील ठेवायचो. हे निश्चितच आज हरवून गेले आहे. आपल्‍याला आपल्‍या फोन्‍सशिवाय अपंग असल्‍यासारखे वाटते. खरेतर कधी-कधी अशा असहाय्य गोष्‍टींची तरतूद म्‍हणून मी काही क्रमांक निश्चितच लक्षात ठेवतो, ज्‍यामुळे मी कोणत्‍याही आपत्‍तीसाठी सज्‍ज असतो.''

अनन्‍या मालिकेमध्‍ये बॉबी बीचवालेची पत्‍नी चंचलची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री अनन्‍या खरे म्‍हणाली, ''आपल्‍या देशाची लोकसंख्‍या वाढली असताना देखील त्‍याप्रमाणात संसाधने वाढलेली नाहीत. लोकसंख्‍या वाढीमुळे आर्थिक, राजनैतिक, सामाजिक व शैक्षणिक अशा समस्‍या केवळ संसाधनांच्‍या अभावामुळेच निर्माण झाल्‍या आहेत. आज लोक त्‍वरित समाधान मिळण्‍यासाठी लहान-सहान गोष्‍टींमागे पळतात, जे मी दिल्‍लीमध्‍ये शाळेत व कॉलेजमध्‍ये असताना फारसे घडायचे नाही. मुंबईमध्‍ये निश्चितच अधिक व्‍यावसायिकीकरण झाले आहे.'' 

टॅग्स :बीचवाले – बापु देख रहा है