मुंबई क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. एनसीबीने आर्यन आणि इतर आरोपींची सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. दरम्यान. या प्रकरणी कमाल आर खान म्हणजे KRK यानं एक व्हिडीओ शेअर करत त्याला अटक कशी झाली आणि या केसमध्ये पुढे कोणते पैलू येऊ शकतात याबाबत सांगितलं आहे. यापूर्वी अनेकदा त्यानं अनेक प्रकरणांवर भाष्य केलं आहे. तसंच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या केआरकेनं अनेक कलाकारांशीही पंगा घेतला आहे.
"एनसीबीनं आर्यन खानशिवाय अन्य सात जणांना अटक केली आहे. त्यांना एनडीपीएस काय १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. आर्यन हा त्या क्रुझ पार्टीचा ब्रँड अँबेसेडर होता. परंतु ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यापूर्वी संबंधिताची परवानगी आवश्यक असते आणि त्यानुसार आर्यन खानचीही परवानगी घेण्यात आली असेल. त्यानं शाहरूख खानला याबाबत विचारल्यानंतर त्यानंही याची परवानगी दिली असेल. जेव्हा या रेव्ह पार्टीच्या तिकिट विक्रीची सुरूवात झाली तेव्हाच एनसीबीनं आर्यन खानला अटक करण्याची योजना आखली," असं केआरकेनं व्हिडीओमध्ये नमूद केलं.