मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात (Aryan Khan Drug Case Update) शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) अडकला. आता चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे (Ananya Panday) ही एनसीबीच्या रडारवर आली आहे. काल एनसीबीची एक टीम अचानक अनन्याच्या घरी धडकली आणि इंडस्ट्रीत खळबळ माजली. काल एनसीबीने सुमारे तीन तास अनन्याची चौकशी केली. आजही तिची चौकशी सुरू आहे. आर्यनच्या मोबाईलमध्ये त्याचं आणि अनन्याचं चॅट एनसीबीच्या हाती लागलं आहे. त्यात एका ठिकाणी गांजाचा उल्लेख आहे. नेमकं हेच चॅट अनन्याला भोवल्याचं कळतंय.
ड्रग्स प्रकरणी आर्यन खान गेल्या 20 दिवसांपासून तुरूंगात आहे. अशात याच प्रकरणात एनसीबीपुढे हजर आण्याचं फर्मान आल्यावर अनन्या दडपएाात आहे. काल पहिल्या दिवशी अनन्या वडिल चंकी पांडेसोबत एनसीबीच्या कार्यालयात गेली होती. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, इंटरोगेशन रूममध्ये दाखल होण्यापूर्वी अनन्या प्रचंंड नर्व्हस होती. कारमध्ये वडिलांच्या गळ्यात पडून ती रडली होती. कसंबसं स्वत:ला सावरत यानंतर ती एकटी इंटरोगेशन रूममध्ये गेली आणि तिथे तिने एनसीबीच्या अधिका-यांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत.
आर्यन खानच्या फोनमध्ये त्याचं आणि अनन्या पांडेचं संभाषण सापडलं. त्यात एका ठिकाणी गांजाचा उल्लेख आहे. ‘काही सोय होऊ शकते का’, अशी विचारणा आर्यनने अनन्याकडे केली आहे. त्यावर मी सोय करते, असं उत्तर अनन्यानं दिलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनच्या फोनमधील चॅट दाखवून एनसीबीच्या अधिका-यांनी अनन्याची चौकशी केली. त्यावर मी केवळ मस्करी करत होते, असं उत्तर अनन्यानं दिलं.आर्यनसोबत सिगारेटबद्दल संवाद झाला. आम्ही अंमली पदार्थांबद्दल बोललो नाही, असं अनन्यानं एनसीबीला सांगितलं. तू अंमली पदार्थ घेतसे का, असा सवाल तिला विचारण्यात आला. त्यावर तिनं ‘नाही’ असं उत्तर दिलं.