Aryan Khan Drug Case : शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) काल आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला आणि एसआरकेचा विश्वासू बॉडीगार्ड रवी सिंग (Ravi Singh) अचानक चर्चेत आला. सुरक्षाकारणास्तव शाहरूख व गौरीने स्वत: न येता रवी सिंगला आर्यनला घ्यायला पाठवलं होतं. आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अडकल्यापासून रवी सिंग सतत चर्चेत आहे. याआधी आर्यन प्रकरणाच्या सुनावणीवेळी, एनसीबी कार्यालयातील चौकशीवेळी अनेकदा रवी सिंग दिसला होता. गेल्या 10 वर्षांपासून रवी सिंग शाहरूखचा बॉडीगार्ड म्हणून काम करतोय. शाहरूखसारख्या बड्या स्टारचा बॉडीगार्ड म्हटल्यानंतर साहजिक सुरक्षेची जोखीम मोठी आणि जोखीम मोठी म्हटल्यावर पगाराचा आकडाही मोठा.
होय, रवी सिंग हा बॉलिवूडचा सर्वात महागडा बॉडीगार्ड आहे. एका रिपोर्टनुसार, शाहरूखकडून रवी सिंग वार्षिक 2.7 कोटी रूपये घेतो. शाहरूख आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा संपूर्ण जिम्मा रवी सिंगच्या खांद्यावर आहे. शाहरूख जिथे जाईल तिथे तो सावलीसारखा सोबत असतो. शिवाय आर्यन, सुहाना खान, अबराम खान, गौरी खान यांच्या सुरक्षेची काळजीही तो घेतो.2014 मध्ये शाहरूखचा हाच बॉडीगार्ड अडचणीत आला होता. वांद्रे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. मराठी अभिनेत्री शर्वरीला एका अवार्ड फंक्शनमध्ये हटकल्याचं हे प्रकरण होतं. या अवार्ड फंक्शनमध्ये शाहरूखसोबत आलेलर असताना गर्दी नियंत्रणादरम्यान त्याचा शर्वरीसोबत वाद झाला होता. याचप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. अर्थात नंतर समज देऊन त्याला सोडण्यात आलं होतं. गेल्या 10 वर्षांत रवी सिंग शाहरूखच्या विश्वासू सदस्यांपैकी एक बनला आहे. या विश्वासापोटीच काल आर्यनला तुरुंगातून न्यायला शाहरूखनं रवीला पाठवलं होतं.