Join us

Aryan khan Drugs Case: ड्रग्स केसमध्ये NCBकडून अजून एक धक्कादायक गौप्यस्फोट, Aryan Khanने एका उगवत्या अभिनेत्रीसोबतही केलं होतं चॅट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 10:52 AM

Aryan khan Drugs Case: आलिशान जहाजावरील ड्रग्स पार्टीप्रकरणी (Mumbai Cruise Drug Case) NCBने अटक केलेला Shahrukh Khanचा मुलगा आर्यन खान याला अद्याप जामीन मिळालेला नाही. Aryan Khanच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

मुंबई - आलिशान जहाजावरील ड्रग्स पार्टीप्रकरणी एनसीबीने अटक केलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अद्याप जामीन मिळालेला नाही. आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी सेशन्स कोर्टाने वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यावर आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. दरम्यान आर्यन खानची जामिनासाठी सुरू असलेली प्रतीक्षा आज संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मात्र याचदरम्यान, आर्यन खान आणि एका अभिनेत्रीमध्ये चॅटिंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आज तक, इंडिया टुडेने या संदर्भातील वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार क्रूझ ड्रग्स पार्टी केसमध्ये आर्यन खानसोबत बॉलिवूडमधील एका उगवत्या अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागले आहे. या चॅटमध्ये नशेबाबत बोलणं  झालं होतं. कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान,  एनसीबीच्या पथकाने आरोपींचे जे चॅट कोर्टासमोर ठेवले आहेत. त्यामध्ये आर्यन खान आणि या अभिनेत्रीमध्ये झालेल्या चॅटचाही समावेश आहे. याशिवाय आर्यन खानचे काही ड्रग्स पेडलरसोबतचे चॅटही कोर्टात सोपवण्यात आले आहेत.

एनसीबीने आर्यन खानला जामीन देण्यात येऊ नये यासाठी एनसीबीने आपले म्हणणे मांडले होते. कोर्टामध्ये त्यावरून दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. आर्यन खानचे इंटरनॅशनल ड्रग्स पेडलर्ससोबत संबंध असल्याचा दावा एनसीबीने कोर्टात केला. तसेच हा मोठा कट असून, ज्याचा तपास होण्याची आवश्यकता आहे, असे एनसीबीने म्हटले आहे.

मात्र आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी एनसीबीचा दावा खोडून काढताना आर्यन खानला झालेली अटक अनावश्यक असल्याचे म्हटले आहे. आर्यन खानकडे कुठल्याही प्रकारचे ड्र्स सापडले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. ज्या व्यक्तीने आर्यन खानला पार्टीमध्ये आणले त्याला अटक झालेली नाही. तसेच मुनमुन धमेचा हिच्याशी आर्यन खानचा काहीही संबंध नसल्याचे आर्यन खानच्या वकिलांनी म्हटले आहे.  

टॅग्स :आर्यन खानमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीशाहरुख खाननार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो