क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) लेक आर्यन खानला (Aryan Khan)अटक झाली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. किंगखानच्या लेकावर तुरुंगात जाण्याची वेळ आली. या प्रकरणादरम्यान बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी शाहरूखला पाठींबा दिला. आता मराठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्यानेही खास शाहरूखसाठी पोस्ट लिहिली आहे. होय, ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane )यांनी शाहरूखसाठी लिहिलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. लढ भावा लढ, तू लढवय्या आहेत. तुझ्या पोरानं गुन्हा केला असंल तर त्याला शिक्षा होईल. त्याचं खापर तुझ्यावर फोडन्याइतके भंगार मेंदूचे आम्ही नाही आहोत. तुझा पोरगा निर्दोष ठरला तर मात्र तुझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांची थोबाडं ठेचली जानार आहेत... त्यावेळीबी तू ‘माज’ करनार नाहीस याची खात्रीय आमाला... कारन तू ख-या अर्थाने ‘शाह’-रूख आहेस.. राजा आहेस.. हार कर जीतने वाला ‘बाजीगर’ आहेस, असे किरण माने यांनी शाहरूखला उद्देशून लिहिलं आहे.
हे बघ भावा, तुझा पोरगा दोषी असंल तर कायद्यानं त्याला काय शिक्षा होईल ती भोगावी लागंल...पर्याय नाय. पन.. त्यो जर निर्दोष आसंल तर कुनाच्या बापाचा बाप बी त्याला शिक्षा करू शकत नाय ! कायद्यापेक्षा मोठ्ठा मानूस पैदा झाला नाय या देशात अजून...
...पन नशिबाशी चाललेल्या या लढाईत तू जो संयम ठेवलायस तो पाहून तुझा लै लै लै अभिमान वाटला गड्या. तू मिडीयाफुडं यिवून घसा फाडून सोत्ताची बाजु मांडायचा धसमुसळेपना केला नाय... कुठल्या राजकिय नेत्याच्या किंवा पक्षाच्या वळचनीला जाऊन पोराच्या सुटकेची भिक मागीतली नाय.. या देशातल्या कुठल्याबी अधिकार्याचं डोळं पांढरं होत्याल एवढा पैसा चारून तू आत्तापर्यन्त पोराला बाहेर काढू शकला असतास.. पन तू ते नाय केलंस ! तू लाच दिली असतीस तर पयल्याच सुनावनीला तो बाहेर असता.. तू तारीख पे तारीख सहन करत वाट पहातोयस... कारन तुझा या देशातल्या 'कायद्या'वर विश्वास हाय !
...आपलं पोटचं पोर असल्या आरोपात अडकनं आनि आपन काहीच न करू शकनं याचं दु:ख - याची वेदना काय असते, ती ओळखायला आपन स्वत: मोठ्या मनाचा 'बाप' असनं गरजेचं असतं ! कद्रू मनाची बांडगुळं मनाला यिल ती टीका करत्यात ती ऐकून तुझ्या काळजाला घरं पडत असत्याल... तू एकांतात हतबल होऊन रडतही असशील... पन तू बादशाह हायेस भावा... किंग खान हायेस... ते तू दाखवून देनार !! आमचा तुझ्यावर विश्वास आहे... जे समोर येईल त्याला तू निधड्या छातीनं सामोरा जाशील !!!
लढ भावा लढ.. तू लढवय्या हायेस.. तुझ्या पोरानं गुन्हा केला असंल तर त्याला शिक्षा होईल. त्याचं खापर तुझ्यावर फोडन्याइतके भंगार मेंदूचे आम्ही नाही आहोत. तुझा पोरगा निर्दोष ठरला तर मात्र तुझ्यावर खोटे आरोप करनार्यांची थोबाडं ठेचली जानार आहेत... त्यावेळीबी तू 'माज' करनार नाहीस याची खात्रीय आमाला... कारन तू खर्या अर्थानं 'शाह'-रूख आहेस.. राजा आहेस.. हार कर जीतने वाला 'बाजीगर' आहेस ! लब्यू दोस्ता.
- किरण माने.