Aryan Khan Gets Bail: ड्रग्ज प्रकरणी गेल्या २५ दिवसांपासून एनसीबीच्या (NCB) कोठडीत असलेल्या आर्यन खानला (Aryan Khan) अखेर गुरुवारी (२८ ऑक्टोबर) जामीन मिळाला. त्याच्यासोबत ड्रग्ज बाळगणाऱ्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून उच्च न्यायालयात आर्यनच्या जामिनावर युक्तिवाद सुरू होता. अखेर त्याला जामीन मिळाला आहे. आर्यनचा जामीन मंजूर झाल्यानंतर खान कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यामध्येच आता आर्यनने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
तुरुंग प्रशासनाच्या माहितीनुसार, आर्यनचा जामीन मंजूर झाल्यानंतर ही गोष्ट त्याला संध्याकाळी ६ वाजता सांगण्यात आली. तुरुंगातील कर्मचारी संध्याकाळी त्याला जेवण द्यायला गेले होते. त्यावेळी त्यांनी आर्यनच्या जामिनाची माहिती त्याला दिली. विशेष म्हणजे ही माहिती मिळाल्यानंतरही त्याने तुरुंगातील जेवणाला हात न लावल्याचं सांगण्यात येतं.
Aryan granted bail : 'एक पिता म्हणून समाधानी'; आर्यनला जामीन मिळताच R Madhavan ने मानले देवाचे आभार
जामीन मिळाल्याचं समजताच आर्यन म्हणाला..
संध्याकाळी सहाच्या सुमारास तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी कैद्यांना रात्रीचं जेवण दिलं. यावेळी ते आर्यनच्या कोठडीतही गेले होते. आर्यनला जेवण देत या कर्मचाऱ्यांनी त्याला जामीन मंजूर झाल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे जामीन मिळाल्याचं समजताच आर्यनने उपस्थित कर्मचाऱ्यांचे आभार मानले. thank you असं म्हणत आर्यनच्या चेहऱ्यावर हसू पसरलं, असं तुरुंगातील प्रशासनाने सांगितलं.
तुरुंगातील कैद्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचं दिलं आश्वासन
सूत्रांच्या माहितीनुसार, २५ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यनची काही कैद्यांसोबत ओळख झाली. यावेळी आर्यनने या कैद्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. इतकंच नाही तर या कैद्यांच्या खटल्यामध्ये त्यांना मदत करणार असल्याचंही म्हटलं आहे.
जामिनावर झाली आर्यनची सुटका
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली होती. मात्र, ही सुनावणी अपूर्ण राहिल्यामुळे आर्यन आणि मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट यांच्या जामीन अर्जावरील उर्वरित सुनावणी २८ ऑक्टोबर रोजी पार पडली. आर्यनतर्फे युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला होता. तर काल अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचातर्फेचा युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र एनसीबीचा युतीवाद राहिल्यामुळे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी काल (२८ ऑक्टोबर) सुनावणी ठेवली. एनसीबीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, आर्यन खानसह अरबाज आणि मुनमुन यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.