आर्यन खान (Aryan Khan) जसा जसा मोठा होतोय, तसा अगदी पापा शाहरूखसारखा दिसू लागला आहे. शाहरूखचाच चेहरा, त्याचाच अंदाज... अगदी सेम टू सेम शाहरूख खान. त्यामुळेच शाहरूखसारखंच आर्यनही बॉलिवूडमध्ये यावं, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. पण कदाचित आर्यनला अॅक्टिंगमध्ये अजिबात रस नाही.
होय, सध्या बॉलिवूडमधून जी काही चर्चा ऐकायला मिळतेय, त्यावरून तरी हेच दिसतं. चर्चा खरी मानाल तर मोठमोठ्या दिग्दर्शकांच्या ऑफर आर्यनने धुडकावून लावल्या आहेत. अगदी यात करण जोहर आणि झोया अख्तर यांचा समावेश आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, करण जोहर (Karan Johar ) आर्यनला लॉन्च करण्यासाठी उत्सुक होता. अजूनही आहे. आर्यनला करणने लहानपणी अंगाखांद्यावर खेळवलंय. आर्यन मोठा झाल्यावर मीच त्याला लॉन्च करणार, असं करणने शाहरूख व गौरीलाही सांगून ठेवलं होतं. पण आता आर्यनने करणची ही ऑफर धुडकावूल लावल्याचं कळतंय. करण त्याच्या होकाराची वाट बघतोय. पण आर्यन आपल्या मतावर ठाम आहे.
केवळ करणच नाही तर झोया अख्तर ( Zoya Akhtar ) हिनेही आपल्या ‘द आर्चीज’साठी आर्यनला निवडलं होतं. पण आर्यनने तिलाही नकार कळवला. आर्यन हुबेहुब शाहरूखसारखा दिसतो. त्याला कॅमेऱ्याची भीती नाही. पण मुळातच त्याला अॅक्टिंगमध्ये इंटरेस्ट नाही. आर्यनला अभिनेता नाही तर लेखक- दिग्दर्शक बनण्यात रस आहे.
काही रिपोर्टनुसार, आर्यन लवकरच लेखक म्हणून डेब्यू करू शकतो. काही वेब शो व चित्रपटांच्या कल्पनांवर त्याचं काम सुरू आहे. आर्यन मोठ मोठ्या दिग्दर्शक-निर्मात्यांच्या ऑफर्स धुडकावतो आहे, पण त्याची बहीण सुहाना खान ही मात्र अॅक्टिंगच्या दुनियेत नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’मधून तिचा डेब्यू होतोय.