Join us

बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टिंग नाही तर काय करणार आर्यन खान?  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 1:45 PM

शाहरुख खानचा ‘झिरो’ हा आगामी चित्रपट याच महिन्याअखेर चित्रपटगृहांत झळकणार आहे. तूर्तास शाहरुख या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये एसआरके मुलगा आर्यन खानबद्दल बोलला.

ठळक मुद्देआर्यनचा बॉलिवूड डेब्यू कधी होणार? असे त्याला विचारले गेले. पण या प्रश्नावर एसआरकेने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

शाहरुख खानचा ‘झिरो’ हा आगामी चित्रपट याच महिन्याअखेर चित्रपटगृहांत झळकणार आहे. या चित्रपटात शाहरुख ‘बऊआ सिंग’ या बुटक्या व्यक्तिचे पात्र साकारताना दिसेल. तूर्तास शाहरुख या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये एसआरके मुलगा आर्यन खानबद्दल बोलला.शाहरुख जिथे जातो, तिथे त्याला त्याच्या मुलांच्या करिअरबद्दल प्रश्न विचारले जातात. या इव्हेंटमध्येही शाहरुखला आर्यनच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल विचारण्यात आले. आर्यनचा बॉलिवूड डेब्यू कधी होणार? असे त्याला विचारले गेले. पण या प्रश्नावर एसआरकेने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. होय, आर्यन हिरो बनू इच्छित नाही, असे शाहरुखने यावेळी सांगितले. आर्यनला हिरो बनण्यात काहीही इंटरेस्ट नाही. तो हिरो नाही तर चित्रपट बनवू इच्छितो. दिग्दर्शनात येऊ इच्छितो. सध्या तो अमेरिकेत याचे ट्रेनिंग घेतोय, असे शाहरुखने सांगितले.

लहान मुलगा अबरामबद्दलही तो बोलला. आर्यनबद्दल मी सांगितले. अबरामबद्दल मात्र आत्ताच काही सांगू शकत नाही. पण तो इतका सुंदर आहे की, रॉकस्टार बनू शकतो, असे शाहरुख म्हणाला.मध्यंतरी करण जोहर आर्यनला लॉन्च करणार, अशी बातमी होती. करण जोहरच्या एका वक्त्व्याने या बातमीला हवा दिली होती. आर्यन जेव्हा केव्हा बॉलिवूड डेब्यू करणार, त्यात माझे सर्वात मोठे योगदान असेल. तो माझा मुलगा आहे. त्याला लॉन्चिंगबद्दल माझ्या मनात अनेक इच्छा आहेत, असे करण जोहरने या मुलाखतीत सांगितले होते.

मी आर्यनच्या लहानपणापासून त्याच्यावर नजर ठेऊन आहे. जो सोशल मीडियावर कुठलाही नवा फोटो टाको. हा फोटो कुठला? त्यातली ती कोण? कुठे मैत्री झाली? असे सगळे प्रश्न शाहरूख विचारण्याआधी मीच आर्यनला विचारतो. मी त्याला माझ्या कडेवर खेळवले आहे. त्यामुळे माझ्यासाठी त्याचे लॉन्च विशेष असेल, असेही करण म्हणाला होता.सध्या आर्यन लंडनमध्ये चार वषार्चा कोर्स करतोय. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याच्या लॉन्चची सगळी जबाबदारी माझी असेल. माज्झ्या मते, आर्यन आणि शाहरूख एकाच फ्रेममध्ये धमाकेदार दिसतील. अर्थात ती नंतरची गोष्ट आहे. पण आर्यनच्या बॉलिवूड डेब्यवेळी त्याच्यापेक्षा मीच अधिक नर्व्हस असेल, असेही करण म्हणाला होता.

टॅग्स :शाहरुख खानझिरो सिनेमा