Join us

'मराठी कलाकार म्हणून महाराष्ट्रासाठी खूप काही करायचंय', 'पहचान कौन' फेम नवीन प्रभाकरनं व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 4:34 PM

Navin Prabhakar : अभिनेता नवीन प्रभाकरने आपल्या अनोख्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना नेहमीच हसवलं आहे. कॉमेडीच्या या बादशहाचा पैचान कोन' हा विनोदी स्कीट सादर होताच टाळ्या आणि शिट्याने प्रेक्षागृह दणाणून सोडलं.

अभिनेता नवीन प्रभाकर(Navin Prabhakar)ने आपल्या अनोख्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना नेहमीच हसवलं आहे. कॉमेडीच्या या बादशहाचा पैचान कोन' हा विनोदी स्कीट सादर होताच टाळ्या आणि शिट्याने प्रेक्षागृह दणाणून सोडलं. नवीन प्रभाकरने जगभरातील प्रत्येक प्रेक्षकाला खदखदून हसवलं. अशा नवीनचा मराठी, हिंदी, दक्षिणेकडे चित्रपटसृष्टीत प्रवास वाखाण्याजोगा आहे. मराठी कलाकार म्हणून महाराष्ट्रासाठी खूप काही  करायचे असल्याचे तो आवर्जुन सांगतो.

नवीन प्रभाकर मूळचा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा गावचा आहे. लहानपणापासूनच मनोरंजन क्षेत्राची आवड असल्याने याचं क्षेत्रात स्थिरावल्याचे तो सांगतो. खऱ्या अर्थाने त्याला टेलिव्हिजनवरील द ग्रेट इंडियन लाफ्टर शोने जगभर ओळख दिली. जगभर केलेल्या शोबद्दल नवीन प्रभाकर सांगतो की, मी जगभर तीन हजारपेक्षा जास्त कॉमेडी शो केले आहेत.  पॅरिस येथील आयफिल टॉवरवर मी कॉमेडी शो करणारा एकमेव कलाकार आहे. आज मी आंतरराष्ट्रीय शो करतो. आज ही मला परदेशातून शोच्या ऑफर येतात. पहचान कौन या कॉमेडी स्कीटमुळेच माझे नाव झाले. 'पहचान कौन मुळेच मी जग फिरलो.

'तो' क्षणच सुखद होताकॉमेडीयन ते अॅक्टर या प्रवासाबद्दल तो म्हणाला की, अभिनेता म्हणून मी जवळ जवळ २२ चित्रपट केले. आठ चित्रपटात मी लीड रोल केला. बाकीच्या चित्रपटात मी सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केल्या. दरबार या चित्रपटात मेघास्टार रजनीकांत बरोबर काम करण्याचा अनुभव विलक्षण होता. कारण ते सुद्धा मराठीच असून त्यांच्या सोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळावी यासारखं भाग्य माझ्या वाट्याला यावं. तो क्षणच सुखद होता.

रंगभूमीवर पदार्पणनवीन प्रभाकर आता रंगभूमीवर पदार्पण करतो आहे. याबद्दल तो म्हणाला की, ‘कॉमेडी नाइट्स’ या कार्यक्रमातून मी पहिल्यांदाच रंगभूमीवर येत आहे, येत्या ऑगस्टपासून मी महाराष्ट्रभर शो करत आहे. रसिकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे. ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नाट्यगृहात येन पावसाळ्यात हस्याच्या सरी धो धो बसरून मायबाप रसिक यातून नाहून निघतील.

टॅग्स :नवीन प्रभाकर