Join us

Asha Bhosle : फिल्म इंडस्ट्रीबद्दल आशा भोसले यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 10:52 IST

आशा भोसले यांनी सिनेइंडस्ट्रीमधील मैत्रीबद्दल बरेच काही सांगितले.

आशा भोसले (Asha Bhosle) म्हणजे भारतीय मनोरंजन विश्वातील सदाबहार गायिका. आशा भोसलेंची गाणी गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आशा भोसलेंनी केवळ मराठी, हिंदीच नव्हे तर त्यांनी गुजराती व साऊथकडील गाणीही गायली आहेत. आशाताई आता नव्वदीच्या घरात असल्या तरीही त्यांच्या सुरांची जादू अजुनही कायम आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये आशा भोसले यांनी सिनेइंडस्ट्रीमधील (Film Industry) मैत्रीबद्दल बरेच काही सांगितले.

आशा भोसले यांनी 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या मुलाखतीत सिनेइंडस्ट्रीमध्ये त्यांच्या फक्त पूनम ढिल्लों आणि पद्मिनी कोल्हापुरे या दोनच मैत्रिणी असल्याचं सांगितलं. कामामध्येच व्यस्त असल्याने कधी मैत्री करण्याची संधीच मिळाली नसल्याचं आशा म्हणाल्या. शिवाय, फिल्म इंडस्ट्रीतल्या महिला एकमेकींवर जळत असतात, त्यामुळे तिथे चांगल्या मैत्रिणी होऊच शकत नसल्याचा खुलासा त्यांनी केला. 

आशा भोसले यांनी सांगितले की, 'माझ्या मैत्रिणी आहेत. पण त्या पुण्यात राहतात. त्यांचा या इंडस्ट्रीशी काहीच संबंध नाही. खरं तर मला इंडस्ट्रीत मैत्रिणी बनवण्याची कधीच संधी मिळाली नाही. कारण माझा बहुतांश वेळ हा कामामध्ये गेला. त्यामुळे तिथे माझ्या मैत्रिणी झाल्या नाहीत. फिल्म इंडस्ट्रीतल्या महिला एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी होऊच शकत नाही. कारण त्या सर्व एकमेकींवर जाळतात. त्यामुळे फिल्मी क्षेत्रात मैत्रिणी कशा बनणार. पण तरीही पूनम ढिल्लों ही माझी चांगली मैत्रीण आहे. तर पद्मिनी कोल्हापुरे माझी भाची लागते, त्यामुळे ती सुद्धा माझ्या खूप जवळची आहे. या क्षेत्रात माझ्या दोनच मैत्रिणी आहेत त्या माझ्यासोबत सदैव सगळीकडे असतात'.

सध्या आशा भोसले या दुबईमध्ये आहेत.  दुबईमध्ये त्यांचं अनेक वर्षांपासून Asha’s रेस्टॉरंट नावाचं हॉटेल देखील आहे. रसिकांना त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाताई ऑफस्क्रीन चविष्ट जेवण बनवतात.  दुबईसह कुवेत, अबू धाबी, दोहा, बहरेन अशा विविध ठिकाणी आशा भोसले यांची हॉटेल्स आहेत. त्यांनी गेल्या २० वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रेस्टॉरंटची साखळी उघडली आहे.

टॅग्स :आशा भोसलेसेलिब्रिटीबॉलिवूडदुबई