Join us

‘व्हॉट झुमका’ गाण्याच्या संगीतकारांना आशा भोसलेंनी सुनावलं, म्हणाल्या, “जुन्या गाण्यांचे रिमेक...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 14:36 IST

RARKPK : ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ हे गाणं ‘झुमका गिरा रे’ या सुपरहिट गाण्याचा रिमेक आहे.

सध्या अनेक जुन्या बॉलिवूड चित्रपटांतील सुपरहिट ठरलेल्या गाण्यांच्या रिमेकचा ट्रेंड आहे. ‘टिप टिप बरसा’ पासून ते ‘एक दो तीन’ अशा गाण्याचे रिमेक झाले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील अनेक रील्स व्हायरल होत आहेत. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा साया’ चित्रपटातील ‘झुमका गिरा रे’ या सुपरहिट गाण्याचा ‘व्हॉट झुमका’ हे गाणं रिमेक आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी हे गाणं गायलं आहे.

परंतु, ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटातीस व्हॉट झुमका हे गाणं आशा भोसलेंच्या पसंतीस उतरलेलं नाही. ‘झुमका गिरा रे’ या गाण्याच्या रिमेकवर आशा भोसलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. “काळ खूप वेगवान बदलत आहे आणि यापुढे बदलत राहील. तुम्ही हे थांबवू शकत नाही. संगीतकार नवीन गाणी बनवण्यासाठी सक्षम नाही. म्हणून ते जुन्या गाण्यांचे रिमेक बनवत आहेत. आज ‘झुमका गिरा रे’ हे गाणं खूप चालत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात ते दिसलं. हे खूप जुनं गाणं आहे,” असं त्या म्हणाल्या.

“पावनखिंड, फर्जंद पाहून गुन्हेगार सुधारले”, दिग्पाल लांजेकरांनी सांगितला अनुभव, म्हणाले, “ठाण्याच्या कारागृहात...”

लग्नाच्या दोन वर्षांनी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज

‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ हे गाणं अरजित सिंह, प्रितम चक्रवर्ती, जोनिता गांधी यांनी गायलं आहे. ‘झुमका गिरा रे’ या गाण्याचं रिमेक असलेलं हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आहे. या गाण्यात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह ठुमके लावताना दिसत आहेत. दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

टॅग्स :आशा भोसलेकरण जोहरसंगीतबॉलिवूडरणवीर सिंगआलिया भट