Join us

"माऊली मला माफ करा", मराठी अभिनेत्रीने का मागितली विठुरायाची माफी? पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 16:15 IST

मराठी अभिनेत्रीने पोस्ट करत विठुरायाची माफी मागितली आहे. तिची पोस्ट चर्चेत आली आहे.

Ashadhi Ekadashi 2024 : दरवर्षी आषाढी एकादशीचा मोठा उत्साह संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतो. यंदाही मोठ्या उत्साहास आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात आणि राज्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. तर सोशल मीडियावरही पंढरपूर आणि वारीतील व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही आषाढी एकादशीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. अभिनेत्री आरती सोळंकीने पोस्ट करत विठुरायाची माफी मागितली आहे. 

आरतीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन विठुरायाचा फोटो शेअर केला आहे. "माऊली मला माफ करा. मागच्या एकदशीला मी ७० किलो वजन कमी करेन, असं ठरवलं होतं. पण, फक्त ६० किलो कमी झालं. पण, मी अजून हार मानलेली नाही. जोपर्यंत मी ७० किलो कमी करत नाही...माझ्यातल्या विठ्ठलापर्यंत पोहोचत नाही. तोपर्यंत माझी ही वारी चालूच राहील. फक्त आशीर्वाद असू द्या माऊली. ७० किलो कमी झाल्यावरच मी आणि माझी आई पंढरपूरला दर्शनाला येऊ", असं कॅप्शन आरतीने या व्हिडिओला दिलं आहे. 

आरतीने तिची वेट लॉस जर्नी सोशल मीडियावर शेअर केली होती. आधी आरतीचं वजन १३२ किलो होतं. तिने तब्बल ६० किलो वजन कमी केल्याचं पोस्टमध्ये म्हटलं होतं. तिचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही थक्क झाले होते. आरतीने नियमित व्यायाम, डाएट करून वजन घटवलं. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. तसंच अनेक कॉमेडी शोमध्येही आरती झळकली आहे. 'बिग बॉस मराठी'मुळे आरती चर्चेत आली होती. 'वृंदावन' या सिनेमातही ती झळकली होती. 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतही ती दिसली होती.  

टॅग्स :टिव्ही कलाकारआषाढी एकादशीसेलिब्रिटी