Join us

आशिष विद्यार्थींची पहिली पत्नीही लग्न करणार? म्हणाल्या, "घटस्फोटानंतर लग्नाची इच्छा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 15:17 IST

आता राजोशी देखील दुसरं लग्न करणार का या चर्चांना उधाण आलंय.

बॉलिवूड सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी ५७ व्या वर्षी लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ५० वर्षीय रुपाली बरुआ सोबत त्यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. यामुळे आशिष विद्यार्थी यांची पहिली पत्नी राजोशी चर्चेत आली आहे. दोन वर्षांपूर्वीच आशिष आणि राजोशी यांचा घटस्फोट झाला. आता राजोशी देखील दुसरं लग्न करणार का या चर्चांना उधाण आलंय.

आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. तर तिकडे पहिली पत्नी राजोशी यांनी काही क्रिप्टीक पोस्ट केल्या. त्या दु:खात बुडाल्याचं त्यांच्या पोस्टवरुन लक्षात येत होतं. त्यात आता राजोशी देखील दुसरं लग्न करणार या चर्चा सुरु झाल्या. यावर त्यांनी एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं. त्या म्हणाल्या, "आशिष खूप चांगला व्यक्ती आहे. गेल्या २ वर्षात आमच्यात काही मतभेद होत होते म्हणून आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मी सध्या दुसरं लग्न करण्याच्या विचारात मुळीच नाही. आशिष यांना पत्नीची गरज होती म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं पण माझं तसं नाही."

त्या पुढे म्हणाल्या, "घटस्फोटानंतर दुसरं लग्न करण्याची इच्छा होणं आणि लग्न करणं यात काहीच चुकीचं नाही. एखादी व्यक्ती वयाच्या २१ व्या वर्षी आणि अगदी ६० व्या वर्षीही लग्न करु शकते. त्यात काहीच वाईट नाही. त्याने दुसरं लग्न केलं म्हणून मला काहीच हरकत नाहीए."

टॅग्स :आशिष विद्यार्थीपरिवारपती- जोडीदारसोशल मीडिया