Join us

में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेत अशोक लोखंडे साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 06:30 IST

में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेत अमरनाथ या व्यक्तिरेखेचा लवकरच प्रवेश होणार असून ही भूमिका प्रसिद्ध अभिनेते अशोक लोखंडे साकारणार आहेत.

ठळक मुद्देसत्याच्या (नीलू वाघेला) पतीच्या भूमिकेत अशोक लोखंडे दिसणार असून ते दोघे वेगळे राहात असले तरी त्यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. आता तब्बल 22 वर्षांनी अमरनाथ सत्याच्या आयुष्यात परत आला आहे.

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो ही मालिका प्रसारित होत असून यात सृष्टी जैन आणि नमिश तनेजा यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांच्याही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील कलाकार सध्या त्यांच्या व्यक्तिरेखांवर प्रचंड मेहनत घेत आहेत. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय, या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना भावत आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांना आपल्यामधीलच एक वाटत आहेत. आता या मालिकेतील आगामी भागात सत्यादेवी म्हणजेच नीलू वाघेला आणि विकी चाचा म्हणजे विवेक मुशरन यांच्यामधील मनोरंजक प्रेम कथेवर प्रकाश टाकला जाणार आहे. पण अडथळ्यांशिवाय कोणतीच प्रेम कथा पूर्ण होऊ शकत नाही असे म्हटले जाते आणि त्याचमुळे त्यांच्या प्रेमप्रकरणात अडथळा आणण्यासाठी एका व्यक्तिरेखेचा मालिकेत समावेश होणार आहे.

में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेत अमरनाथ या व्यक्तिरेखेचा लवकरच प्रवेश होणार असून ही भूमिका प्रसिद्ध अभिनेते अशोक लोखंडे साकारणार आहेत. मालिकेत सत्याच्या (नीलू वाघेला) पतीच्या भूमिकेत अशोक लोखंडे दिसणार असून ते दोघे वेगळे राहात असले तरी त्यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. आता तब्बल 22 वर्षांनी अमरनाथ सत्याच्या आयुष्यात परत आला आहे. त्याने एक गुन्हा केला असून पोलिसांच्या कचाट्यातून स्वतःला लपवण्याचा तो प्रयत्न करत आहे. अमरनाथ कमालीचा स्त्री-द्वेष्टा आहे. त्याला स्त्रियांवर वर्चस्व गाजवायला आवडते आणि त्याच्या मते स्त्री आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाही. सत्याच्या आयुष्यात परत आल्यानंतर सत्या आणि विकीला एकत्र बघणे त्याला सहन होत नाहीये आणि त्याचमुळे तो त्या दोघांना एकमेकांपासून दूर ठेवण्यसाठी अनेक प्रयत्न करणार आहे.

में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेतील भूमिकेविषयी अशोक लोखंडे सांगतात, “‘या प्रसिद्ध मालिकेचा भाग होणे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. अमरनाथची भूमिका खूप रागीट आणि वर्चस्व गाजवणारी आहे. त्याला स्त्रियांनी केलेली प्रगती सहन होत नाही. ही भूमिका मी आत्तापर्यंत टेलिव्हिजनवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे.”

टॅग्स :में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो