Join us

एक लाजरा न्‌ साजरा मुखडा म्हणत अश्विनी भावे यांनी अमेरिकेत साजरा केला आनंद,व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 6:00 AM

अमेरिकेत राहूनही अश्विनी भावे यांचं मराठी प्रेम, मराठी संस्कृतीवरील प्रेम कमी झालेले नाही. दारापुढे अंगण, अंगणात तुळस आणि सोबतीला इतर झाडं अशी संस्कृती ग्रामीण भाग वगळता अपवादानेच पाहायला मिळते.

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. मात्र अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपलं मराठीपण कायम जपलं आहे. 

अमेरिकेत राहूनही अश्विनी भावे यांचं मराठी प्रेम, मराठी संस्कृतीवरील प्रेम कमी झालेले नाही. दारापुढे अंगण, अंगणात तुळस आणि सोबतीला इतर झाडं अशी संस्कृती ग्रामीण भाग वगळता अपवादानेच पाहायला मिळते. शहरी भागातून लोप पावत जाणारी हीच मराठी अंगण संस्कृती अभिनेत्री अश्विनी भावे यांनी परदेशात जोपासली आहे.

परसातली भाज्या ही पारंपरिक पद्धती त्यांनी अमेरिकेतही जिवंत ठेवली आहे. त्यांचा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत यशस्वीरित्या सुरु आहे. याचा माहिती आपल्या रसिकांना आणि प्रत्येक नागरिकाला कळावी यासाठी अश्विनी भावे यांनी फेसबुकवर द ग्रीन डोअर हा नवा उपक्रम सुरु केला आहे. या माध्यमातून त्या आपल्या प्रत्यक्ष जीवनात घरी राबवल्या जाणा-या परसातल्या भाज्या या उपक्रमाची माहिती रसिकांशी शेअर करत असतात. अश्विनी भावे यांनी अमेरिकेत त्यांच्या घराच्या मागच्या कुंपणामध्ये वेगवेगळी फळं, फुलं आणि भाज्यांची बाग फुलवली आहे. याच भाज्या त्यांच्या स्वयंपाकाचाही भाग असतात. 

नुकतेच त्यांच्या अंगणात मक्याच्या कणसाचे रोपटं उगवल्याच्या व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अश्विनी फिल्मी स्टाइलने आपला आनंद व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. मक्याचा एक दाणा त्यांनी रोवला होता त्या दाण्याचं बघता -बघता  भलं मोठं रोपटं झालं. आगदी लहान मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेताना मिळणारा आनंदा हा वेगळाच असल्याचे अश्विनी सांगता. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ पाहून आपल्यालाही अशाप्रकारे उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की.

टॅग्स :अश्विनी भावे