Join us

Aastad Kale Birthday Special : या अभिनेत्रीवर होते आस्ताद काळेचे प्रेम... कॅन्सरने काही वर्षांपूर्वी झाले तिचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 12:57 PM

आस्ताद गेली अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. आस्तादच्या मालिकांना, त्यामधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतले आहे.

ठळक मुद्देप्राची मते त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेतील या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. खऱ्या आयुष्यातही त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. पण वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी प्राचीचे कॅन्सरने निधन झाले.

आस्ताद काळेचा आज म्हणजेच १६ मे ला वाढदिवस असून अग्निहोत्र, सरस्वती, पुढचे पाऊल, सरस्वती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनला त्याने हजेरी लावली होती. या कार्यक्रमामुळे आस्ताद खऱ्या आयुष्यात कसा आहे हे त्याच्या चाहत्यांना जाणून घेता आले. तिला काही सांगायचंय या त्याच्या नाटकाला सध्या प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

आस्ताद गेली अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. त्याच्या मालिकांना, त्यामधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतले आहे. त्याने मालिकांप्रमाणेच चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये देखील काम केले आहे. आस्तादला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या चित्रपटाची, मालिकेची, नाटकाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात. 

१६ मे १९८३ रोजी पुण्यात जन्मलेल्या आस्तादने खूपच कमी वयात अभिनय क्षेत्रातील त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढचे पाऊल या मालिकेतील स्वप्नाली पाटीलसोबत तो नात्यात असून त्याने बिग बॉस मराठी या कार्यक्रमात त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. आस्तादचे स्वप्नालीच्या आधी एका मुलीवर जीवापाड प्रेम होते. पण तिचे काही वर्षांपूर्वी एका आजाराने निधन झाले. 

आस्तादने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अग्निहोत्र या मालिकेत काम केले होते. या मालिकेत अभिनेत्री प्राची मते त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेतील या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. खऱ्या आयुष्यातही त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या नात्याबद्दल सगळ्यांनाच कल्पना होती. पण वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी प्राचीचे कॅन्सरने निधन झाले. प्राचीला बोनमॅरो कॅन्सर होता आणि तिचा आजार अंतिम टप्प्यात असताना त्याचे निदान झाले होते. प्राचीची तब्येत दिवसेंदिवस ढासाळायला लागली होती. त्यामुळे तिने मालिकांमध्ये काम करणे देखील सोडले होते. तिच्या शेवटच्या दिवसांत आस्ताद तिच्या सतत सोबत होता. तिचे निधन होऊन पाच वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. 

 

टॅग्स :अस्ताद काळे