Join us

मॅच संपली अन् केएल राहुलनं दिली अथिया शेट्टीवरच्या प्रेमाची जाहीर कबुली...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2021 10:57 AM

होय, सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहित KL Rahul ने त्याच्या प्रेमभावना व्यक्त केल्या. Athiya Shetty नेही केली कमेंट

बॉलिवूडचा ‘अण्णा’ सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी  (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल  (KL Rahul) यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. पण आत्तापर्यंत दोघांनीही प्रेमाची कबुली दिली नव्हती. पण काल अथियाच्या 29 व्या वाढदिवसाचं निमित्त साधून  केएलने अखेर प्रेमाची जाहीर कबुली दिलीच. होय, सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहित केएलने त्याच्या प्रेमभावना व्यक्त केल्या. (Athiya Shetty and KL Rahul make their relationship public)अथियासोबतचे फोटो शेअर करत, ‘हॅपी बर्थ डे माय लव्ह’ असं कॅप्शन देत केएल राहुलने त्याच्या व अथियाच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं.  या पोस्टवर अथियानेसुद्धा हृदयाचं इमोजी पोस्ट केला आहे. अथियाचा बाबा सुनील शेट्टी आणि भाऊ अहान शेट्टी यांनही या पोस्टला लाईक करत हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

अथिया आणि राहुल गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. खरे तर आत्तापर्यंत अथिया व केएल यांपैकी कुणीही अधिकृतपणे या नात्याची कबुली दिली नव्हती. पण डेटींगच्या चर्चेला हवा देण्याचे काम मात्र त्यांनी न चुकता केले होते. दोघांचे एकत्र फोटो, एकत्र बाहेर फिरणे, एक दुस-यांचे फोटो शेअर करणे आणि त्यावर क्यूट कमेंट करणे यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.  नुकतेच हे दोघं एकमेकांसोबत लंडनला फिरायला गेले होते.अथिया शेट्टी हिने ‘हिरो’या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. अनीस अज्मीच्या ‘मुबारकां’मध्ये अथियाला दुसरी संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. ‘मोतीचूर चकनाचूर’ हा तिचा तिसरा सिनेमाही सुपरडुपर फ्लॉप झाला. तिसरा चित्रपटही फ्लॉप ठरल्यानंतर अथियाच्या करिअरची नौका बुडताना दिसतेय. पण दुसरीकडे अथियाच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात आहे. 

टॅग्स :अथिया शेट्टी लोकेश राहुल